woman  
उत्तर महाराष्ट्र

घरात तिघे आले अन्‌...तिला विवस्त्र करत काय केले

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील गणपती नगरातील उचभ्रू वस्ती म्हणून ओळख आहे. जवळच जिल्हा पोलिस अधीक्षकांचा निवास्थन आहे. परंतू भरदिवसा गणपतीनगरात बुधवारी एका अपार्टमेंटमधील एका घरात दोन पुरुष व एक महिला घुसून घरात एकट्या महिलेला विवस्त्र करून मारहाण करीत प्रॉपर्टीचे कागदपत्र आणि लाखोंची रोकड लांबविल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. 

जळगाव शहरातील काव्यरत्नवाली ते डीमार्ट दरम्यान व्यापारी, अधिकाऱ्यांचा रहिवास असलेला 
असे सदन परिसर म्हणून ओळख आहे. या मुख्य रस्त्यावर असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या पिडीत महिला 15 जानेवारीला घरात एकट्या होत्या. यावेळी अज्ञात दोन व्यक्ती 
आणि एक महिला घरात घुसून पिडीत महिलेला मारहाण करायला सुरवात केली. त्यानंतर हातपाय बांधून विवस्त्र करून पुन्हा बेदम मारहाण केली आणि घरात असलेले प्रॉपर्टीचे कागदपत्र, चार लाखाची रोकड व सोने-चांदीचे दागिने असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून घेतला. 

ठार मारण्याची धमकी 
पिडीत महिलेला मारहाण होत असल्याने पिडीताने मदतीसाठी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र भामट्यांनी आरडाओरड केल्यास जीवेठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कागदपत्र आणि रोकड घेऊन तिघे पसार झाले. 


पोलिसांचे घटनास्थळी दाखल 
घटना घडल्यानंतर महिला प्रचंड घाबरलेली होती. सायंकाळी घरी नातेवाईक आल्यानंतर घडलेल्या प्रकार महिलेने सांगितला. या घटनेबद्दल आज सकाळी रामानंद नगर पोलिस स्टेशन गाठून महिला व त्यांच्या नातेवाइकांनी घडलेली हकिगत सांगितली. पोलिसांनी तक्रार नोंदवत पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी घटनास्थळी भेट दिली. तर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्याचे काम सुरू करात तपास सुरू केला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT