jalgaon mnpa bilding
jalgaon mnpa bilding 
उत्तर महाराष्ट्र

जळगाव मनपा प्रशासनाचा गोंधळी कारभार 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः तत्कालीन नगरपालिकेने रिंगरोडवरील जिल्हा बॅंकेजवळील खुला भूखंड जागृती महिला मंडळाला दिला होता. या जागेवर अनधिकृतपणे जिल्हा बॅंकेच्या शाखा सुरू असल्याचे आढळून आले होते. या संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षा मंगला बाजीराव पाटील या होत्या. त्या हयात नाही. मात्र, नावात साधर्म्य असल्याने कुठलीही शहानिशा न करता महापालिका प्रशासनाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकारी मंगला पाटील यांना ही नोटीस बजावली. त्यामुळे महापालिकेचा गोंधळी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 
तत्कालीन जळगाव नगरपालिकेने 1988 मध्ये खुला भूखंड जागृती महिला मंडळाला देण्याचा ठराव केला होता; परंतु संस्थेने ही जागा अनधिकृतपणे कोणताही हक्क नसताना जिल्हा बॅंकेच्या एका शाखेसाठी करार करुन भाड्याने दिलेले आहे. त्यामुळे ही जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने संस्थेच्या अध्यक्षा मंगला बाजीराव पाटील यांना म्हणणे मांडण्यासाठी 5 डिसेंबर दुपारी चारला सुनावणीसाठी उपस्थित राहावे, अशा आशयाची नोटीस काढली. परंतु त्यांचे निधन झाले असून, केवळ नाव साधर्म्य असल्याने राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी मंगला पाटील यांना ही नोटीस महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. 

 
आधीची नोटीस कोणाला ? 
ही जागा ताब्यात घेण्यासाठी एक महिन्यापूर्वी महापालिकेने नोटीस पाठविली असल्याचा उल्लेख नोटिशीत आहे. त्यात स्थायी सभापती ऍड. शुचिता हाडा यांनी पंधरा दिवसांपूर्वी ही जागा ताब्यात घेण्याबाबत पत्र आयुक्तांना दिले होते. त्यात महिन्याभरापूर्वी नोटीस पाठवूनही खुलासा सादर न केल्याने पुन्हा दुसऱ्यादा सुनावणीची नोटीस बजावली आहे, असा उल्लेख आहे. मात्र, पहिली नोटीस महापालिका प्रशासनाने कुणाला बजावली, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

माझी कोणतीही संस्था नसून, सदस्य सुद्धा नाही. तरी देखील माझ्या घरच्या पत्त्यावर महापालिकेने जागा ताब्यात घेण्यासाठी नोटीस दिली आहे. ही नोटीस बघितल्यानंतर मलाही आश्‍चर्य वाटले. दुसऱ्यांच्या संस्थेची नोटीस मला आली असा अजब गोंधळी कारभार महापालिकेचा यातून दिसत आहे. 
- मंगला पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जळगाव 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT