Jitendra Patil acquired 2 acres of ginger by earning lakhs of rupees from experimenting with farming nandurbar news esakal
उत्तर महाराष्ट्र

Ginger Farming : वावरची पॉवर; अद्रकाची शेती 2 एकरांवर, उत्पन्न मिळाले 10 लाखांवर!

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : अवकाळी पाऊस, निसर्गाची अनिश्चितता, नापिकी, वातावरणातील बदल यामुळे पारंपरिक शेती अडचणीत आल्याचे चित्र एकीकडे असताना महाराष्ट्रातील नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे.

शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील शेतकरी जितेंद्र पाटील यांनी असाच एक प्रयोग केला आहे. (Jitendra Patil acquired 2 acres of ginger by earning lakhs of rupees from experimenting with farming nandurbar news)

जितेंद्र पाटील यांनी पावणेदोन एकरांत आले शेतीच्या प्रयोगातून लाखोंची कमाई करून एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.

महाराष्ट्रातील नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले आहे. पारंपरिक शेतीमध्ये अनेकदा फायदा कमी आणि नुकसान जास्त होते. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकरी विविध प्रयोग करत असतात. काही शेतकऱ्यांनी तर मिश्रशेतीकडे मोर्चा वळविला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने मिरचीच्या शेतीला प्राधान्य देतात. हा

जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश सीमेपासूनजवळ असल्याने शेतकऱ्यांनादेखील तेथील बाजारपेठांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत असल्याचे दिसून येते. जितेंद्र पाटील यांनी आले शेतीतून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे.

त्यांनी दोन एकरांत १६ टन आल्याचे उत्पादन घेतले. विशेष म्हणजे महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेशच्या व्यापाऱ्यांकडून जागेवरच त्यांच्याकडून चाळीस रुपये प्रतिकिलोने हे आले खरेदी केले जात आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

शेती हा बिनभरवशाचा व्यवसाय आहे. मात्र शेतीकडे पाहण्याचा शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलला तर शेतीतूनही चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकते हे जितेंद्र पाटील यांनी दाखवून दिले. जितेंद्र पाटील यांच्याकडे एकूण १४ एकर जमीन असून, त्यांची काही जमीन गावाजवळ आहे. गावाजवळील जमिनीत पाळीव, जंगली प्राणी आणि अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, वातावरणातील बदल यांसारख्या कारणांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे.

त्यामुळे त्यांनी पावणेदोन एकर जमिनीत काही नवीन प्रयोग करण्याचे ठरविले. त्यांनी बाजारपेठेचा अंदाज घेत कृषी विभाग व नंदुरबार येथे नव्याने निर्मित शासकीय कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांच्या मदतीने आले शेती करण्याचे नियोजन केले.

यासाठी श्री. पाटील यांनी आले बियाणे नाशिक येथून वीस रुपये किलोने खरेदी केले होते. आता त्यांनी आपल्या शेतातून आले काढण्यास सुरवात केली आहे. मध्य प्रदेशमधील व्यापारी जागेवर चाळीस रुपये किलो दराने त्यांच्याकडून आले खरेदी करत आहेत.

त्यांनी लागवडीपासून काढणीपर्यंत दोन लाख रुपयांचा खर्च केला आहे. दोन एकरांत दहा लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळाले आहे. खर्च वजा जाता आठ लाख रुपये निव्वळ नफा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

"बाजारपेठेचा अंदाज पाहून शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास शाश्वत उत्पादनाचा मार्ग खुला होत असतो. बाजारपेठेत आल्याला चांगली मागणी असते, हे लक्षात घेऊन पारंपरिक पिकांना फाटा दिला." -जितेंद्र पाटील, आले उत्पादक शेतकरी

प्रयोगशील शेतीचा लाभ

-पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वाटचाल.

-क्षेत्र पावणेदोन एकर, खर्च दोन लाख, उत्पन्न दहा लाख.

-कृषी विभाग व शासकीय कृषी महाविद्यालयाच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन.

-महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरातमधील व्यापाऱ्यांकडून जागेवरच खरेदी.

-शेतीच्या नव्या प्रयोगातून गवसला शाश्वत शेतीचा मूलमंत्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT