Collector Ayush Prasad next to Superintendent of Police M Rajkumar while giving certificates of appointment to nine compassionate persons in the police force. esakal
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon News : अनुकंपाधारक पोलिस पाल्यांना महसूल विभागात नोकरी; चेहऱ्यावर फुलले हास्य

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्हाधिकाऱ्यांच्या आधिपत्याखालील सामाईक अनुकंपाधारकांच्या यादीत पोलिस दलातील उमेदवारांचा समावेश करण्यात आला असून ९ अनुकंपाधारक उमेदवारांना शुक्रवारी (ता.१३) तलाठी, लिपिक, टंकलेखक या वर्ग ३ पदावर नियुक्ती देण्यात आली. (Jobs in revenue department for children of dead policemen jalgaon news)

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाल्याने उमेदवारांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आधिपत्याखालील सामाईक अनुकंपाधारकांच्या यादीत शासकीय नोकरी करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने या उमेदवारांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती.

त्यानुसार 'क' संवर्गातील १० जागांसाठी १५ उमेदवारांच्या कागदपत्रांची ४ ऑक्टोबर रोजी पडताळणी करण्यात आली.‌ कागदपत्रांच्या पडताळणी नंतर ९ उमेदवारांना शुक्रवारी अंतिम नियुक्ती पत्र देण्यात आले.

जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती प्रक्रिया प्रक्रिया राबविणारे उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, तहसीलदार पंकज लोखंडे, योगेश पाटील, वैशाली पाटील, प्राजक्ता वाघ, रियाज पटेल यांचे कौतुक करून सदर अनुकंपा नियुक्तीबाबत पोलिस अधीक्षक राजकुमार यांनी पोलिस प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त केले.

यांना मिळाले नियुक्तीपत्र

तलाठी पदावर छाया चैत्राम झटके, दामिनी धर्मेंद्र महाजन, शीतल राजेश राजपूत, सोनाली रमेश कोळी, रेणुका रमेश पाटील, शीतल राजेंद्र अवस्थी तर लिपिक, टंकलेखक पदावर रितेश विजय पवार, हर्षल ब्रिजलाल पाटील व मृणाल मधुकर मेहरूणकर यांना नियुक्ती देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Singh: ध्येयवेड्यांनीच क्रांती केल्याचा इतिहास: जलपुरुष राजेंद्र सिंह; बंदुकीच्या जागी हातात कुदळ, फावडी

Latest Marathi News Live Update : सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, बाळा नांदगावकर यांची मागणी

कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीमध्ये घरात चिंतेचं वातावरण, दिराने सांगितलं कुटुबात नक्की चाललंय काय?

Mumbai News: एशियाटिक टाऊन हॉलची दुरवस्था! इतिहास जपायचा की निवडणुका जिंकायच्या? दुहेरी आव्हान उभं

Beed News: गरोदर महिलेच्या जिवाशी खेळ कशासाठी? लेबर रूमसमोरच महिलेची प्रसूती, बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT