On the occasion of Navratri festival, devotees thronged Khodaimata temple in the city for the first rosary darshan. esakal
उत्तर महाराष्ट्र

Navratri 2023 : खोडाईदेवी यात्रेला उत्साहात सुरवात; पहिल्याच दिवशी हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी

सकाळ वृत्तसेवा

Navratri 2023 : लाखो भक्तांचे श्रद्धास्थान व नंदुरबारचे ग्रामदैवत खोडाईमातेच्या यात्रोत्सवाला रविवारी (ता. १५) घटस्थापनेपासून मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात सुरवात झाली. पहाटे तीनपासूनच महिला-पुरुषांनी देवीच्या दर्शनासाठी रीघ लागली होती. (Khodai Devi Yatra started with happiness devotees flock for darshan nandurbar news)

दिवसभर ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. यात्रेचा पहिला दिवस असला तरी रविवारची सुटी आल्याने पहिल्याच दिवशी यात्रेतही मोठ्या प्रमाणात गर्दी व उत्साह दिसून आला.

नंदुरबार जिल्ह्यातील यात्रोत्सवाला नंदुरबार शहरातील खोडाईदेवीच्या यात्रेपासून प्रारंभ होतो. नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या मंदिराला रंगरंगोटी केली जाते. परिसर स्वच्छ केला जातो. मंदिरात भाविक कायम दर्शनासाठी येतात. साध्या पद्धतीने मोकळ्या जागेत टेकडीलगतच्या नाल्यात देवीची स्थापना आहे. स्वयंभू मूर्ती असल्याने आजही ‘जैसे थे’ आहे.

लगतच्या गुजरात-मध्य प्रदेशमधीलही भाविक येथे दर्शनासाठी व नवस बोलणे व फेडण्यासाठी येतात. नवरात्रोत्सवात यात्रा भरत असल्याने लाखो भाविक नऊ दिवसांत येथे हजेरी लावतात. विशेषतः त्या गर्दीमुळे यात्रेत प्रचंड गर्दी असते. सकाळी दर्शनासाठी, तर सायंकाळी दुपारपासून दर्शनासोबतच यात्रेत येणाऱ्यांची गर्दी वाढते. त्यामुळे रात्री यात्रेत उत्साह असतो.

विविध प्रकारचे खेळणे, पालखी, झुले. गृहोपयोगी वस्तू विक्रेते. कटलरी, महिला शृंगार यासह खाद्यपदार्थ विक्रेत्यांची शेकडो दुकाने येथे लागली आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासूनच व्यावसायिक येथे दाखल होण्यास सुरवात झाली होती. गर्दी लक्षात घेता येथे बंदोबस्तासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. स्वतंत्र पथक रात्रंदिवस येथे कार्यरत आहे.

पार्किंगसाठी व्यवस्था

भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्याने तसेच ग्रामीण भागातून व लगतच्या जिल्ह्यातूनही भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यांना वाहने लावून दर्शन घेता यावे म्हणून मंदिर ट्रस्टने बीएसएनल कार्यालयाजवळ पार्किंगची व्यवस्था केली आहे. तसेच मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पाण्याचे संकट दूर करण्यासाचंद्रकांत रघुवंशींचे साकडे

नंदनगरीवरील पाण्याचे संकट आणि शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच माळेला ग्रामदैवत खोडियार मातेला साकडे घातले.

नवरात्रोत्सवाला चैतन्यमय व मोठ्या उत्साहात रविवारी प्रारंभ झाला. सकाळी अकराल शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांसमवेत ग्रामदैवत खोडियार मातेचे दर्शन केले. जिल्ह्यात यंदा कमी पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे आहे.

रब्बी हंगामाला सुरवात झाली असून, शेतकऱ्यांची भरभराट व्हावी, तसेच नंदनगरीच्या जनतेवर आलेले पाण्याचे संकट दूर कर, अशी प्रार्थना करीत माजी आमदार रघुवंशी यांनी खोडियार मातेचरणी साकडे घातले. उद्योजक मनोज रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, डॉ. तुषार रघुवंशी, थिया रघुवंशी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, शेतकी संघाचे अध्यक्ष बी. के. पाटील, माजी नगरसेवक रवींद्र पवार, अभियंता किरण तडवी उपस्थित होते.

जि.प. अध्यक्षांनी घेतले दर्शन

जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी रविवारी पहिल्या दिवशी सकाळी देवीचे दर्शन घेतले. त्यांनी जिल्ह्यातील संकट दूर होऊन साऱ्यांनाच सुखी व समाधानी राहू दे, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT