Superintendent of Police Sanjay Barkund, Police Inspector Hemant Patil of LCB and a team of the accused from Mokka who were detained by the local crime branch. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : मोक्कातील आरोपीच्या आवळल्या मुसक्या; एलसीबीची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : मोहाडी परिसरात दहशत माजविणाच्या एलसीबीने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह काडतूस जप्त करण्यात आले.

एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना १८ ऑक्टोबरला मोहाडी परिसरात सुनील रमेश जाधव दहशत माजवत असल्याची माहिती मिळाल्याने एलसीबीने कारवाईचा बडगा उगारला. (LCB action against accused in Mokka dhule crime news)

मुळात सुनील जाधव गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याच्याविरोधात मोक्कांतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे योग्य ती सावधानता बाळगत एलसीबीने या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

उपनिरीक्षक अमरजित मोरे, अशोक पाटील, मुकेश वाघ, जितेंद्र वाघ, हर्शल चौधरी यांना सोबत घेऊन मोहाडी गाठले. पोलिसांना पाहून सुनीलने पळण्याचा प्रयत्न केला. मात्र एलसीबी पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.

या वेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा तसेच दोन हजार रुपये किमतीचे काडतूस आढळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एलसीबी पथकाने ताब्यात घेतलेला सुनील जाधव मोहाडी उपनगर येथील पिंपळादेवीनगर येथील रहिवासी असून, त्याच्याविरोधात मोहाडी पोलिसांत मोक्कांतर्गत तीन गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT