Leaders in district are  confused by developments in NCP nandurbar news
Leaders in district are confused by developments in NCP nandurbar news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar NCP News : राष्ट्रवादीतील घडामोडींनी जिल्ह्यात नेतेही ‘कन्फ्यूज’; नवीन पिढी अजित पवारांच्या पाठीशी

धनराज माळी

Nandurbar NCP News : पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नंदुरबार जिल्ह्याचा दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी विरोधी पक्षांवर तोफ डागत राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेते-पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना पक्षसंघटनासंदर्भातील बूस्टर डोस दिला.

राष्ट्रवादी कशी पुन्हा भक्कम करता येईल या संदर्भात कार्यकर्त्यांना मागदर्शन केले अन् रविवारी (ता. २) अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची, तर पक्षातील इतर नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. (Leaders in district are confused by developments in NCP nandurbar news)

यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर पुन्हा तसाच प्रत्यय रविवारी आल्याने नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते व पदाधिकाऱ्यांना राज्यात घडतेय तरी काय? याविषयी काहीही कळत नसल्याचे चित्र आहे.

नंदुरबार जिल्हा तसा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला होता. त्या वेळी विद्यमान मंत्री डॉ. विजयकुमार गावित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीत तेव्हा असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यासोबतच ते घेऊन गेले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कमी झाले.

अशाच स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम धुरा सांभाळत जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी पक्षसंघटनाला तडा जाऊ दिला नाही. गेले त्यांच्याशिवाय व आहेत त्यांच्यासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन आजही सुरू आहे. तसे म्हटले तर पक्षाचे नेते शरद पवार यांना मानणारा मोठा गट जिल्ह्यात आहे. मात्र त्यांच्यानंतर आताची नवीन पिढीही अजित पवार यांच्यासोबत आहे. शेवटी काका-पुतण्या दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी दोघांना मानले काय किंवा एकाला मानले काय शेवटी पक्षनेतृत्व तेच आहेत. मात्र विद्यमान जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांचे व पवार कुटुंबीयांचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काय व अजित पवार काय, दोन्हीही तेवढ्याच प्रतिष्ठेचे आहेत. मात्र तरुण पिढी म्हणून त्यांचा संबंध अजित पवार यांच्याशी जास्त आहे.

दौऱ्यात पक्षसंघटनासाठी टिप्स

नुकतेच १५ जूनला अजित पवार नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी पक्षसंघटनासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांना बूस्टर डोस दिले. पक्षसंघटन वाढवून आगामी निवडणुकीत मला मुख्यमंत्री म्हणून बघायचे असेल तर जिल्ह्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून द्या, त्यासाठी स्थानिक स्तरावर, ग्रामीण भागातील जनतेशी थेट संवाद साधा, बूथ केंद्रापासून तर मतदान काढणाऱ्यांपर्यंतचे मायक्रो प्लॅनिंग करण्यासंदर्भात टिप्स दिल्या.

त्यांचा दौऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मरगळ दूर होऊन उत्साह वाढला होता. आगामी निवडणुकीचा दृष्टीने जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे पक्षबांधणीला लागले आहेत. कार्यकर्ते उत्साहात आहेत.

असे असताना रविवारी अचानक अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समाविष्ट होऊन त्यांचा झालेला शपथविधी हा नक्कीच जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शॉक देणारी घटना आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते कन्फ्यूज आहेत. त्यामुळे आता वेळच ठरवेल, नेमके काय घडेल? त्यानंतरच नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी कोणासोबत हे स्पष्ट होईल.

"पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार १५ जूनला येऊन गेले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अचानक आजच्या घडामोडी घडल्या. मात्र पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवारही स्वतः राष्ट्रवादीतच असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी एकत्र आहे. त्यामुळे आज तरी आम्ही राष्ट्रवादीतच आहोत. पुढे काय होते त्यावर पुढचे निर्णय जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ठरवू." -डॉ. अभिजित मोरे,जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, नंदुरबार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT