crime news  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : ठाणसिंग भिलला जन्मठेप; महिला खून प्रकरणी जिल्हा न्यायालयाचा निकाल

प्रतीक जोशी

धुळे : मागील भांडणाच्या कुरापतीतून महिलेच्या खून प्रकरणी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने ठाणसिंग मोहन भिल यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. (Life imprisonment for Than Singh Bhil Verdict of the district court in case of murder of woman Dhule Crime News)

कळमसरे (ता. शिरपूर) येथे १९ ऑक्टोबर २०१९ ला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपी ठाणसिंग मोहन भिल याने नीलाबाई सहादू ठाकरे (रा. कळमसरे) हिच्याशी मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला. त्या वेळी केशव ठाकरे, नकूबाई अंबरसिंह भिल, साजन धनराज भिल, अविनाश भिल, कैलास भिल, ठाणसिंग भिल यास समजावत असताना त्याने नीलाबाई ठाकरे हिच्या डोक्यात लोखंडी फावड्याने वार करत दुखापत केली.

त्यामुळे नीलाबाई रक्‍ताच्या थारोळ्यात पडली. नंतर आरोपी भिल त्याच्या घराला कुलूप लावत पळून गेला. नीलाबाई ठाकरेला शिरपूर येथे उपचारासाठी दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. घटनेचा साक्षीदार तथा मृत नीलाबाईचा मुलगा केशव ठाकरे (भिल) याने आरोपी ठाणसिंग याच्याविरुद्ध शिरपूरला गुन्हा दाखल केला. जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले.

हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

खटल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एच. मोहम्मद यांच्यासमोर कामकाज चालले. सरकार पक्षातर्फे सात साक्षीदारांची विशेष सहाय्यक सरकारी वकील ॲड. गणेश वाय. पाटील यांनी साक्ष घेतली. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक संजय सानप यांची साक्ष नोंदविण्यात आली.

कामकाजानंतर सरकार पक्षाने दाखल केलेले पुरावे ग्राह्य मानत न्या. महोम्मद यांनी आरोपी भिल यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच त्याला पाच हजारांचा दंड व तो न भरल्यास तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ॲड. पाटील यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांचे मार्गदर्शन लाभले. ॲड. मयूर बैसाणे यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT