murder 111.jpg
murder 111.jpg 
उत्तर महाराष्ट्र

प्राध्यापक व शिपाईच्या खून प्रकरणी चौकीदाराला जन्मठेप

प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सटाणा येथील ना. म. सोनवणे महाविद्यालयातील प्रा. सुनील सागर व शिपाई दादाजी मगरे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन खून केल्याच्या आरोपावरुन महाविद्यालयाचा चौकीदार बलदेवसिंग पाल (वय ४५, रा. दऱ्हाणे शिवार) याला येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. येथील जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश आर. एच. मोहंमद यांनी मंगळवारी हा निकाल दिला. या खून खटल्याकडे जिल्हयाचे लक्ष लागून होते.

या खटल्याची माहिती अशी.. 

महाविद्यालयातील चौकीदार बलदेवसिंग पाल याला संस्थेकडून कायमस्वरुपी नोकरीचे आदेश निघालेले होते. महाविद्यालय हे आदेश बजावत नसल्याचा राग डोक्यात ठेवून बलदेवने कुऱ्हाड घेत महाविद्यालयात धुमाकुळ घातला. त्याने प्रथम प्रा. प्रफुल्ल ठाकरे यांच्या डोक्यात, मानेवर कुऱ्हाडीने वार करुन त्यांना जबर जखमी केले. यानंतर प्रा. सुनील सागर यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन त्यांना ठार मारले. शिपाई दादाजी मगरे यांचाही कुऱ्हाडीने वार करुन खून केला. तसेच प्रा. दिलीप शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. १३ फेब्रुवारी २०१४ ला महाविद्यालयात हा थरारक प्रकार घडला होता.

हल्ल्यात शिपाई व प्राध्यापकाचा मृत्यू

शिपाई मगरे यांचा नाशिक येथे उपचार घेत असताना त्याच दिवशी मृत्यू झाला तर प्रा. सागर यांचे (ता.१६) फेब्रुवारीला उपचार सुरु असताना निधन झाले. सटाणा पोलिसांनी  चौकीदार पाल याला अटक करुन त्याच्याविरुध्द खून व खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन खटला न्यायालयात पाठविला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक बी. आर. जायभावे व शशिकांत शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. न्यायाधीश मोहंमद यांच्या समोर या खटल्याचे कामकाज झाले. अतिरिक्त सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट अशोक पगार यांनी सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासले. न्यायालयाने आरोपी मानसिक रुग्ण असल्याचे म्हणणे फेटाळून लावत आरोपीने थंड डोक्याने दोघांचा थरकाप उडावा या पध्दतीने हल्ला करुन खून केल्याचे ग्राह्य धरुन गुन्हा सिध्द झाल्याने बलदेवसिंग पाल याला मरेपर्यंत आजन्म जन्मठेपेची व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.या खटल्यासाठी पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व पोलिस शिपाई नितीन देवरे यांनी ॲडव्होकेट पगारे यांना सहाय्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT