lineman day esakal
उत्तर महाराष्ट्र

Lineman Day : नंदुरबार येथे उद्या लाइनमन दिवस

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : देशभरातील लाइनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्र सरकारने ४ मार्चला देशभरात लाइनमन दिवस (Lineman Day) साजरा करण्याबाबत सार्वजनिक व खासगी विद्युत क्षेत्रातील आस्थापनांना सूचना केल्या आहेत. (Lineman Day will be celebrated in Mahavitaran on March 4 nandurbar news)

त्या अनुषंगाने येत्या ४ मार्चला महावितरणमध्ये लाइनमन दिवस साजरा करण्यात येणार असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत.

जनमित्र म्हणजेच लाइनमन हा महावितरणच्या व्यवस्थेमधील अत्यंत महत्त्चा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस तसेच इतरही अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चोवीस तास सेवा देतात. त्यांच्या या कामाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात महावितरणच्या राज्यभरातील प्रादेशिक व परिमंडल स्तरावर आयोजित मुख्य कार्यक्रमांमध्ये नियमित व बाह्यस्रोत महिला व पुरुष लाइनमनचा प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंता यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

याशिवाय ग्रामीण भागात विभाग कार्यालयाचे कार्यक्षेत्र विस्तारलेले व दुर्गम आहे अशा विभागांतील उपविभाग कार्यालय किंवा अतिदुर्गम शाखा कार्यालयांमध्ये स्वतंत्रपणे लाइनमन दिवसाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना वीज सुरक्षेची शपथ देऊन वीज सुरक्षेबाबत प्रबोधन करण्यात येईल. सोबतच सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता आदी कार्यालयप्रमुख या कार्यक्रमास मार्गदर्शन करतील.

शिवाय महिला व पुरुष लाइनमन यांचे अनुभव कथन होऊन त्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. महिला व पुरुष जनमित्रांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case : मुलीच्या शरीरावर टणक हत्याराने वार केल्याने जखमा; शवविच्छेदन अहवालात आणखी काय? आरोपीला कुणी केली मदत?

Baramati Politics: अजितदादांच्या अपघाती जाण्याने जनतेचे स्वप्न अधुरे; २०२९ मध्ये सुनेत्रा वहिनींनीच बारामतीतून लढावे : जय पवार

Latest Marathi News Live Update : डीएमकेने आज आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव मंजूर केले

Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये 'निशांत' पर्व सुरू! नितीश कुमारांच्या सुपुत्राकडं आरोग्य विभागाची धुरा; 32 नव्या मंत्र्यांची शपथ, भाजपच्या 9 बड्या नेत्यांना डच्चू

iPhone 17 चक्क 45 हजारपेक्षा कमी किंमतीत मिळतोय; 'इथे' खरेदी केल्यास मिळेल बंपर डिस्काउंट, ऑफर सुरू होताच लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT