Liquor smuggler Dinu Don business is in Nepal dhule crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : मद्य तस्कर दिनू डॉनचा नेपाळलाही व्यवसाय! चौकशीदरम्यान माहिती समोर

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : मद्य तस्कर दिनू डॉन ऊर्फ दिनेश निंबा गायकवाड (रा. शिरूड, ता. धुळे) याने थेट नेपाळमध्येही काही व्यवसाय सुरू केल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आल्याचे समजते. दरम्यान, त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.

२००२ ते २०२१ पर्यंत विविध पोलिस ठाण्यांत विविध कलमांन्वये सुमारे २१ गुन्हे दाखल असलेला फरारी बनावट मद्य तस्कर दिनू डॉन याला धुळे तालुका पोलिसांनी २९ जूनला अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली. (Liquor smuggler Dinu Don business is in Nepal dhule crime news)

संशयित दिनू डॉनकडून तपासात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. धुळे तालुका पोलिस ठाण्यात २०२२ मध्ये दाखल दारूबंदी कायद्याच्या गुन्ह्यात अटक झाली. पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी त्याची चौकशी सुरू केली.

बनावट दारू बनविण्यासाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी बनावट दारूचे कारखाने उभारून, बनावट दारू बनविण्याकरिता मध्य प्रदेश, गुजरातमधून स्पिरिट, बनावट दारू बनविण्यासाठी लागणारा इतर कच्चा माल, साहित्य छुप्प्या पद्धतीने आणून परिसरातील स्थानिक गरजू मुलांना आणि लोकांना त्यांच्या आर्थिक मजबुरीचा फायदा घेऊन त्यांच्याकडून बनावट दारू तयार करून घेणे, बनावट दारू साथीदार व हस्तकांकरवी चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, परभणी, सोलापूर आणि इतर दुर्गम व मागास भागात पुरवठा करून छुप्या पद्धतीने विक्री करणे अशी त्याची कार्यपद्धती असल्याचे चौकशीदरम्यान पुढे आल्याचे समजते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, त्याने इतर राज्यांतदेखील अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याची शक्यता आहे, त्यादृष्टीनेही पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे तपास करत आहेत. दिनू डॉनने नेपाळमध्येही काही व्यवसाय सुरू केल्याची व त्याअनुषंगानेही चौकशी सुरू असल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आल्याचे समजते.

विविध ठिकाणी गुन्हे

दिनू डॉन ऊर्फ दिनेश गायकवाड याने धुळे तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत २००२ पासून २०२२ पर्यंत ११ गुन्हे केले आहेत. धुळे शहर पोलिस ठाणे, आझादनगर पोलिस ठाणे, शिरपूर शहर पोलिस ठाणे, जळगाव एमआयडीसी पोलिस ठाणे, पारोळा पोलिस ठाणे, खुलताबाद पोलिस ठाणे (औरंगाबाद), जायखेडा पोलिस ठाणे (नाशिक), कसाईज पोलिस ठाणे (नाशिक) प्रत्येकी एक तसेच गौड पिंपरी पोलिस ठाणे, चंद्रपूर प्रत्येकी दोन गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दिनू डॉनने इतर राज्यांतदेखील अशाच प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. काही गुन्ह्यांमध्ये तो फरारी घोषित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET SCAM : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट ! सीबीआयच्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांचे कॉलेजकडून निलंबन

ITR Update: आयकर विभागाने जारी केले सर्व ITR फॉर्म! तुमच्यासाठी कोणता योग्य? ऑनलाइन रिटर्न कसा भराल? जाणून घ्या

Kerala CM VD Satheesan : कोण आहेत केरळचे नवे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन? 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक...

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटीचं प्रकरण तापलं, पुण्यात NSUI कडून आंदोलन, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Pune Hospital: माणुसकीला काळिमा! पुण्यातील हॉस्पिटल वाद चिघळला, १३ तासांचे बिल ३.२५ लाख, मृतदेह रोखून धरल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक..

SCROLL FOR NEXT