Crime News esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : नवापूरला साडेआठ लाखांचा मद्यसाठा जप्त

सकाळ वृत्तसेवा

नवापूर : शहरालगत गुजरात-महराष्ट्र सीमेवर पुन्हा वाहनांसह १२ लाख ३२ हजारांचा अवैध मद्यसाठा पकडण्यात आला असून, चालकासह दोन आरोपी ताब्यात घेतले आहेत. ही कारवाई २० नोव्हेंबर पहाटे पावणेसहाच्या सुमारास करण्यात आली.

पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून २० नोव्हेंबर पहाटे पावणेसहाच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ यांच्या सोबत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गुमानसिंग पाडवी, हवालदार दिनेश वसुले, दिनेश बाविस्कर, पंकज सूर्यवंशी, विकी वाघ, प्रशांत खैरनार, रणजित महाले गस्तीवर असताना महेंद्र बोलेरो पिक-अप (एमएच ३९, एडी ११८३)मध्ये दोन व्यक्ती नवापूरकडून गुजरातमध्ये करंजी मार्गाने देशी दारू व बिअरचे खोके घेऊन जाताना खोकरवाडाजवळ झडती घेतली असता सात लाख ३९ हजार २०० रुपये किमतीच्या २२० नग खोक्यांत देशी दारू, ९३ हजार ६०० रुपयांची ३० बिअरचे खोके आढळले.(Liquor stocks worth eight and a half lakh seized from Navapur Nandurbar Crime News)

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची...

चार लाखांची महिंद्र बोलेरो पिक-अप, पांढऱ्या रंगाची मोटार (एमएच ३९, ओडी ११८३) असा १२ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईत वाहनचालक अबिदखान सत्तारखान सिकलीकर (वय ३७) व शैलेश कालू राठोड (वय २८, दोघे रा. नवापूर) यांना ताब्यात घेतले. पोलिस शिपाई बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi World Record: रोहित, पोलार्ड अन् हेडसारख्या दिग्गजांनाही इतक्या वर्षात जे जमलं नाही, ते वैभवंनं केलंय

राधे राधे! जप सुरू होता, अचानक उलटली बोट; यमुना नदीत दुर्घटनेआधीचा VIDEO समोर

गिरीजा आणि नितीन गडकरी यांची आहे खास ओळख ; जुना किस्सा सांगत अभिनेत्री म्हणाली..

Basket Bridge Kolhapur : पंचगंगा नदीवरील बास्केट ब्रीजचे काम लवकरच सुरू होणार, अडीच वर्षांत काम अपेक्षित; खासदार महाडिकांनी घेतला आढावा

HIV Report: एचआयव्हीच्या चुकीच्या अहवालाने संसार उद्ध्वस्त; महिलेवर दीड वर्षे औषधोपचार, साेलापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार!

SCROLL FOR NEXT