Death News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : M Pharmacyच्या विद्यार्थ्याची तापी नदीत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील महाविद्यालयात एम. फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने सावळदे (ता. शिरपूर) येथील पुलावरून तापी नदीत उडी टाकून आत्महत्या केली. राहुल नामदेव पाटील (वय २३) असे मृत युवकाचे नाव असून, तो रोटवद नांद्रा (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील रहिवासी आहे. (M Pharmacy student commits suicide in Tapi river dhule news)

शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेणारा राहुल करवंद नाका परिसरातील चामुंडामाता मंदिराजवळ जोशी यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. २१ जूनला त्याचा पेपर होता. मात्र आजारी असल्यामुळे त्याने पेपर दिला नव्हता.

दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी साडेपाचला कोणालाही न सांगता तो निघून गेला. ही बाब घरमालकाने त्याच्या घरी कळविली. त्यामुळे त्याचा शोध सुरू होता. त्याचा भाऊ ललित पाटील याने दिलेल्या माहितीवरून शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता नोंद करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शुक्रवारी (ता. २३) सकाळी सावळदे येथील तापी नदीपात्रात युवकाचा मृतदेह तरंगताना आढळला. त्यावरून त्याच्या कुटुंबीयांना ओळख पटविण्यासाठी बोलविण्यात आले. त्यांनी मृतदेह राहुलचा असल्याचे सांगितले.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Controvarsy: शुभमन गिलला कॅप्टन व्हायचं नव्हतं, रोहित शर्माकडून BCCI ने ते हिसकावून घेतले; अजित आगरकर व निवड समितीने प्रचंड दबाव आणला...

मी दमलीये! लग्नानंतर आशुतोष यांच्या पाहुण्यांना कंटाळलेल्या रेणुका शहाणे; शेवटी एके दिवशी रागात...

AAP Bihar Candidate List : बिहार निवडणुकीसाठी 'AAP'ने वाजवला बिगुल!, पहिली उमेदवार यादी केली जाहीर

Mumbai Police: मुंबईत २९ दिवस ड्रोन आणि कंदील उडवण्यावर बंदी; दिवाळीपूर्वी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर!

RBI ECL Rule: आरबीआयच्या नवीन नियमांमुळे खासगी बँकांचे कर्ज महागणार? कोणत्या बँकांवर होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT