Mahabeej News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : महाबीजचे बियाणे रास्त दरानेच खरेदी करावे; जिल्हा व्यवस्थापकांचे शेतकऱ्यांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : खरीप-२०२३ हंगामासाठी महाबीज बियाण्याची मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.

या हंगामासाठी महाबीजकडून पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून दिले जाणार असल्याने शेतकऱ्यांनी बियाणे रास्त दरानेच खरेदी करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे नंदुरबार जिल्हा व्यवस्थापक बाबासाहेब कोटकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे. (Mahabeej seeds should be purchased at a fair price Appeal of district managers to farmers Dhule News )

बियाण्याचे दर

पीक, उपलब्ध वाण व बॅगची साइज (किलोमध्ये), तर विक्रीदर प्रतिबॅग (रुपये)- सोयाबीन- जेएस-३३५, जेएस-९३०५, डीएस-२२८, एमऐयूएस-७१-३० किलो बॅग, दोन हजार ७३० रुपये दर, फुले संगम, फुले किमया, एमऐयूएस-६१२, १६२- २० किलो बॅग २०४० रुपये दर, एमएसीएस-११८८, १२८१, एमयूएस-१५८- ३० किलो, तीन हजार ६० रुपये.

भात- इंद्रायणी-१० किलो बॅग ६६० रुपये दर, २५ किलो एक हजार ६०० रुपये दर, कोईमतूर-५१- २५ किलो, एक हजार ७५ रुपये दर, मूग- उत्कर्षा, पीकेव्हीएम-४, बीएम-२००३-२ व इतर वाण- २ किलो, ३६० रुपये दर, ५ किलो, ८७५ रुपये दर, तूर- बीडीएसन-७१६, फुले राजेश्वर पीकेव्ही तारा-२ किलो, ३९० रुपये दर, बीडीएन-७११, बीएसएमआर-७३६, मारुती, आयसीपीएस-८७११९ (आशा)- २ किलो, ३६० रुपये दर.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

उडीद- एकेयू १०-१ (बॅल्क गोल्ड), टीएक्यू-१, २ किलो बॅग ३५० रुपये दर, ५ किलो, ८५० रुपये दर, संकरित ज्वारी- सीएसएच-९, महाबीज-७, सीएसएच-१४, भाग्यलक्ष्मी-२९६- ३ किलो, ४२० रुपये दर, संकरित बाजरी- महाबीज १००५- १.५ किलो, २४० रुपये दर, सुधारित बाजरी- धनशक्ती- १.५ किलो, १६५ रुपये दर, नागली- फुले नाचणी- १ किलो, ११० रुपये दर, संकरित- सूर्यफूल- ५०० ग्रॅम, १५० रुपये दर याप्रमाणे असतील.

शेतकरी बांधवांनी महाबीज बियाणे रास्त दरानेच खरेदी करावे. कोठेही जास्त दराने विक्री होत असेल तर मोबाईल क्रमांक ८६६९६४२७२६ वर संपर्क साधावा, असेही श्री. कोटकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT