Dr Appasaheb Dharmadhikari should return Maharashtra Bhushan
Dr Appasaheb Dharmadhikari should return Maharashtra Bhushan esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्रभूषण परत करावा : महेश घुगे

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी व अनुयायांच्या माध्यमातून डॉ. धर्माधिकारी करत असलेल्या जनसेवेला तोड नाही. (Mahesh Ghuge statement about Dr Appasaheb Dharmadhikari should return Maharashtra Bhushan dhule news)

मात्र महाराष्ट्र शासनाने दिलेल्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान १३ जणांचा उष्माघाताने मृत्यू व शेकडो जण अद्यापही उपचार घेत आहेत. या पार्श्वभूमीवर उठलेले वावटळ लक्षात घेता डॉ. धर्माधिकारी यांनी महाराष्ट्रभूषण पुरस्कार परत करणे उचित ठरेल, अशी भावना महेश घुगे यांनी व्यक्त केली.

खरेतर डॉ. धर्माधिकारी यांनी आपल्या अनुयायांद्वारे केलेले कार्य एवढे महान आहे, की त्यापुढे महाराष्ट्रभूषण पुरस्कार थिटा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय ईप्सित साध्य करण्यासाठी यंदाचा हा पुरस्कार जाहीर केला व त्याला डॉ. धर्माधिकारी बळी पडले हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे, अन्यथा हा पुरस्कार नेहमीप्रमाणे मुंबई, पुण्यातील एका मोठ्या सभागृहात सन्मानपूर्वक आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत प्रदान करता आला असता.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

२० लाख अनुयायांना गैरसोय सहन करत, जीवघेण्या उष्णतेत उपस्थितीची भावनात्मक सक्ती करण्याचीही गरज नव्हती, असे श्री. घुगे यांनी म्हटले आहे. मुळात २० लाख अनुयायांच्या उपस्थितीत पुरस्कार देण्याच्या निर्णयाला डॉ. धर्माधिकारी यांनी विरोध करायला हवा होता. मात्र, शिंदे-फडणवीस यांच्या भूलभुलय्याला ते बळी पडले.

डॉ. धर्माधिकारी यांच्या कार्यावर शिंतोडे उडविण्याची संधी मिळाली नव्हती पण या दुर्घटनेने टीकेची वावटळ उठली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. धर्माधिकारी यांनी महाराष्ट्रभूषण पुरस्कार सन्मानपूर्वक परत करायला हवा, असे श्री. घुगे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी

SCROLL FOR NEXT