Deputy Superintendent of Police Rishikesh Reddy talking to coordinators of Sakal Maratha Samaj on the sidelines of Mumbai Padayatra. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मराठा समाजबांधव पदयात्रा आज मुंबईकडे रवाना

मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी (जि. जालना) येथून पदयात्रेद्वारे मुंबईकडे रवाना होणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी (जि. जालना) येथून पदयात्रेद्वारे मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी धुळे जिल्ह्यातून सकल मराठा समाज आंदोलनात सहभागी होणार आहे.

शनिवारी (ता.२०) सकाळी दहाला जेलरोडवरील आंदोलनस्थळापासून समाजबांधव पदयात्रेने मुंबईकडे रवाना होतील.

दरम्यान, पोलिस उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी समन्वयकांची बैठक घेऊन पदयात्रेच्या अनुषंगाने चर्चा केली. (Maratha Samajbandhav Padayatra left for Mumbai today dhule news)

मराठा समाजातर्फे पदयात्रेबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. प्रवासात सहभागी आंदोलकांसाठी नाश्ता, जेवण निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, या पदयात्रेच्या अनुषंगाने धुळे शहर पोलिस ठाण्यात पोलिस उपअधीक्षक श्री. रेड्डी यांनी सकल मराठा समाजाच्या प्रमुख समन्वयकांची बैठक घेऊन चर्चा केली. पदयात्रेचा मार्ग व या प्रवासातील अडीअडचणी त्यांनी समजून घेतल्याचे समाजातर्फे सांगण्यात आले.

यावेळी धुळे शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एस. आय. शेख, पोलीस उपनिरीक्षक सुधाकर पाटील, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र परदेशी, वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.

धुळ्यातील पदयात्रेचा मार्ग

शनिवारी (ता.२०) जेलरोडवरील आंदोलन स्थळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन, पुढे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेला प्रारंभ होईल.

जेलरोड- नवीन महापालिका- झाशी राणी पुतळा-महाराणा प्रताप पुतळा- फूलवाला चौक- श्रीराम मंदिर- आग्रारोडने मनोहर टॉकिज जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- अग्रसेन महाराज चौक- दसरा मैदान- गुरुद्वारापासून पदयात्रा मालेगावकडे रवाना होईल.

सायंकाळी सातच्या सुमारास पदयात्रेचा पहिला मुक्काम पुरमेपाडा येथील हॉटेल शिवराय येथे होईल. समाज बांधवांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना व आवाहनानुसार अंथरूण, पांघरूण, दैनंदिन आवश्यक औषधी.

वस्तू सोबत आणाव्यात असे आवाहन सकल मराठा समाजाचे समन्वयक सुधाकर बेंद्रे, माजी आमदार प्रा. शरद पाटील, विनोद जगताप, साहेबराव देसाई, निंबा मराठे, भानुदास बगदे, सुनील पाटील, राजेंद्र काळे.

दीपक रौंदळ, विकास बाबर, श्रीरंग जाधव, संदीप पाटोळे, मनोज ढवळे यांच्यासह इतर समाजबांधवांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : देवेंद्र फडणवीस चांगलं काम करतात...भ्रष्टाचाराचं कोणतं प्रकरण कानावर आलं नाही...अण्णा हजारेंकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक!

Monsoon Beach Travel: पावसाळ्यात समुद्रकिनारी फिरायला जातंय? या गोष्टी लक्षात ठेवा

मोठा निर्णय : नीता अंबानीची टीम पुढील हंगामात नव्या नावासह मैदानात उतरणार, मुंबई इंडियन्स फ्रँचायझी...

Maharashtra Latest News Live Update : नागपुरात उद्या तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर भोसलेकालीन काळी-पिवळी मारबत मिरवणूक निघणार..

Daulat Sugar Factory Auction : दौलत साखर कारखान्याची होणार विक्री, ‘एनसीडीसी’कडून लिलावाची नोटीस; ९ ऑक्टोबरला ई-लिलाव

SCROLL FOR NEXT