virasing girase
virasing girase 
उत्तर महाराष्ट्र

लग्‍नानंतर फिरायला गेलो पण पत्‍नीशी बोलताही येत नाही; अन्‌ भरावे लागतेय दोन रूमचे भाडे

एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : लग्‍नानंतर पती- पत्नी मालदीव गेलो. पण तेथील बियाधू आयलँडवरील रिसॉर्टमध्ये अडकून पडलो असून व्हिसाची मुदतही संपली. रविवारपासून (ता. 14) पुढे 14 दिवस क्वारंटाईन ठेवणार आहेत. रोजचा हॉटेलचा खर्च पंधरा हजार (भारतीय चलनाएवढे) आहे. याशिवाय व्हिसा मुदत वाढ व अव्वाच्या सव्वा मेडीकल बिल दिले जात आहे. आम्हाला ताबडतोब मदत मिळवून द्या. मालदीवचे हॉटेल कर्मचारींपासून तर अधिकारींपर्यंत कोणीही सहकार्य करीत नाही. आम्ही खूप अडचणीत आहोत, वीरपालसिंग गिरासे सांगत होते. आज रविवारी त्यांनी मोबाईलवर संपर्क साधत त्यांच्यावर आलेली आपत्ती सांगितली.
मेथी येथील वीरपाल गिरासे व त्यांची पत्नी पूजा गिरासे हे मधुचंद्रासाठी एका प्रख्यात ट्रॅव्हल्स कंपनीकडून १० मार्चला मालदीवला गेले. तेथे त्यांची व्यवस्था बियाधू आयलँडच्या एका रिसॉर्टवर करण्यात आली. भारतातून निघतांना त्यांचे कोविड परीक्षण झाले होते. तेव्हा त्यांचा मेडिकल रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मालदीवला त्याच दिवशी दुपारी साडेचारला पोहचल्यावर पुन्हा त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी पूजा गिरासेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे मालदीवच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र तिला कोणतेही लक्षण जाणवत नव्हते. 

वेगळे राहत असल्‍याने भाडे लागतेय डबल
एकाच दिवसात दोन देशात दोन वेगवेगळे अहवाल कसे हा प्रश्न आहे. दोघांपैकी एक अहवाल चुकीचा आहे असे म्हणता येईल. दरम्यान त्यांच्यासोबत अनेक भारतीय प्रवासी होते. त्यांना कोरोनाची लागण नाही. हॉटेल व्यवस्थापनने पती- पत्नीना वेगवेगळ्या खोलीत रहावयास भाग पाडले. त्यामुळे खोलीभाडे दुप्पट झाले. 

व्हीसाची मुदत संपली करायचे काय?
वीरपाल गिरासेंनी सांगितले, की पत्नीला भेटूही शकत नाही. तब्येत कशी आहे विचारता येत नाही. नेमके काय सुरू आहे कळायला मार्ग नाही. दरम्यान दररोजचे हॉटेल भाडे 15 हजार रुपये आहे. दहा मार्च ते 14 मार्च रविवारपर्यंत व्हिसाची मुदत होती; ती आज संपली आहे. व्हिसा मुदतवाढीसाठी खर्च लागणार असून पूजाची औषधींची बीले आदी मोठा खर्च आहे. विमान परतीचे तिकीटही रद्द झाले आहे. नवीन तिकीटासाठी वेगळा खर्च असून ट्रॅव्हल्स कंपनीने हात वर केले आहेत. भारतीय राजभवनाशी संपर्क केला असून अद्याप हालचाल नाही. पैसेही संपत आले आहे. पुढील दिशा काय असावी कळेनासे झाले आहे. 

लुटीचा अनुभव केला शेअर
मालदीवमध्ये कोणाकडूनही सहकार्य मिळत नाही. त्यामुळे एका अनोळखी देशात आमचे खूप हाल होत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा श्री. गिरासे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान मालदीवबाबत अनेकांना वाईट अनुभव आला असून तेथे पर्यटकांची अनेकदा फसवणूक होते. कोविड काळात शेकडो पर्यटकांना तपासणी अहवाल व त्या अनुषंगाने लुटीचा अनुभव आल्याचे देश विदेशातील पर्यटकांचे मॅसेज गिरासेंनी पाठवले.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT