bhalchandra nemade 
उत्तर महाराष्ट्र

अहिराणीचे वर्चस्‍व वाढविले पाहिजे : भालचंद्र नेमाडे 

जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : मुघल काळात खानदेशाला मोठे महत्त्व होते. अहिराणीत बोलणारे व लिहिणारे वाढत आहेत. संस्कृतपेक्षा आधीची भाषा आहे. ही नॅचरल भाषा आहे. रोज काही भाषा मरत आहेत. पुढे एकतृतीयांश भाषा मरतील. अहिराणीचे वर्चस्व वाढविले पाहिजे. आपला अभिमानास्पद इतिहास आहे, असे विचार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी मांडले. 

उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ व अहिराणी संवर्धन परिषदेतर्फे शनिवारपासून तीनदिवसीय ऑनलाइन विश्व अहिराणी साहित्य संमेलनाला गवराई पूजन व ग्रंथदिंडीने सुरवात झाली. त्या वेळी साहित्यिक नेमाडे बोलत होते. संमेलनाचे अध्यक्ष बापूसाहेब हटकर अध्यक्षस्थानी होते. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, कृषिमंत्री दादा भुसे, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पद्मश्री राम सुतार, अॅड. उज्ज्वल निकम, कवी ना. धो. महानोर, सचिन गोस्वामी, सुभाष अहिरे, स्वागताध्यक्ष विकास पाटील, सदाशिव सूर्यवंशी व एन. एम. भामरे आदी उपस्थित होते. 

नेमाडे म्हणाले, की अहिराणी मुळातच चांगली भाषा आहे. इतर भाषिक अहिराणीला कमी लेखतात. खरंतर त्यांनी त्यांच्या भाषा सुधारायला हव्यात. भाषेतील लोक किती नवनवीन शोध लावतात. संवर्धन करतात. त्याच्यावर भाषेचे वैभव वाढते. अहिराणीत सर्व जाती धर्माचे लोक एकजुटीने राहतात. जातिभेद नाही. जातिभेद नष्ट करणारी अहिराणी आहे. दरम्यान, ग्रंथदिंडीत साहित्यिकांनी फुगड्या खेळत आनंद व्यक्त केला. स्वागताध्यक्ष विकास पाटील यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. 

जन्मदात्या भाषेला विसरू नये 
जन्मदात्या भाषेला विसरू नये. खानदेशातील पाणी प्रश्न सुटला पाहिजे. तापीचे पाणी उचलले गेले पाहिजे. कोरडवाहू जमिनीचे बागायतीत रूपांतर झाले पाहिजे. खानदेशाचे रुपड बदलेल. 
-ना. धो. महानोर (ज्येष्ठ साहित्यिक )  

संपादन ः राजेश सोनवणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND, Video: 'तू कॉल दे ना!', रोहिक शर्मा श्रेयस अय्यरवर वैतागला; दोघांचा संवाद स्टंप माईकमध्ये कैद

Plane Crash Explosion Video : भयानक विमान दुर्घटना! उड्डाण घेताच मोठा स्फोट अन् क्षणात आगीच्या गोळ्यात रूपांतर

Modi’s Mission Book: ‘मोदीज मिशन’ पुस्तकात नरेंद्र मोदींचा प्रवास उलगडणार! देवेंद्र फडणवीस मोठी भूमिका बजावणार; प्रकाशन सोहळा कधी?

Uttrakhand Tourism : सुरखाब या परदेशी पक्षाच्या आगमनाने उत्तराखंडमधील पर्यटक भारावले, पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

रीलसाठी तोंडात पेटवले 8 सुतळी बॉम्ब, 7 नीट फुटले पण शेवटच्या बॉम्बचा तोंडात स्फोट, जबडा तुटून बाहेर

SCROLL FOR NEXT