Coronavirus 
उत्तर महाराष्ट्र

‘होम क्वारंटाईन' रुग्ण कोविड सेंटरमध्ये दाखल करा 

रमाकांत घोडराज

धुळे : गेल्या काही दिवसात जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही चिंतेची बाब असल्याने कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी कंटेन्मेंट झोनची कठोर, प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करावी, त्यादृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य विभागाने तातडीने कार्यवाही करावी. होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांना औषधोपचारासाठी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कठोरपणे कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी बुधवारी दिले. 

जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी बुधवारी (ता.१०) जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. जगदाळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिका आयुक्त अजीज शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), कोरोनाचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, मनपाचे उपायुक्त गणेश गिरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील, डॉ. महेश मोरे, डॉ. दीपक शेजवळ, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग आदी उपस्थित होते. 

विवाहाचे बंधने होणार कठोर
जिल्हाधिकारी श्री. जगदाळे म्हणाले, की धुळे महानगर क्षेत्राबरोबरच ग्रामीण भागात रुग्णसंख्या देखील वाढत आहे. ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लवकरच जनता कर्फ्यू लागू करावा लागेल. त्यामुळे विवाह सोहळ्यावरील उपस्थितीची बंधने अधिक कठोर करण्यात येतील. मंगल कार्यालयाची वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. त्यासाठी पथकांचे गठन करण्यात येईल. दरम्यान, जिल्ह्यातील शिरपूर, साक्री, शिंदखेडा, दोंडाईचा येथील मुख्याधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात पसरणाऱ्या करोनावर मात करण्यासाठी हॉकर्सचे नियोजन करणे व पथके वाढवण्याबाबत बैठकीत चर्चा केली. 

व्यापाऱ्यांचे सहकार्य राहील 
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नितीन बंग यांनी शहरातील विशेषतः पेठ भागातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी विविध सूचना केल्या. तसेच कोरोनावर नियंत्रण करणाऱ्या प्रशासनाच्या प्रयत्नांना व्यापाऱ्यांचे पूर्णतः सहकार्य होते व यापुढेही राहील. व्यापारी संकुलात यासाठी व्यापाऱ्यांच्या संघटनेने ‘नो मास्क् नो एन्ट्री‘ मोहीम कठोरतेने राबवायची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC Election: बंडखोरी टाळण्यासाठीचा डाव भाजपवरच कसा उलटला? पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं? ‘राष्ट्रवादीं’ची आघाडी यशस्वी?

माेठी बातमी! बॉम्बस्फोट प्रकरणातील बंटी जहागीरदारची हत्या; सात राउंड फायर, मित्र जखमी, आरोपी सीसीटीव्हीत कैद!

Plane Service : दिल्लीतील धुक्याचा विमानसेवेला फटका; पुण्याला येणारी तीन उड्डाणे रद्द; प्रवाशांची गैरसोय

8th Pay Commission : आठवा वेतन आजपासून लागू,सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या

सनी देओलच्या प्रेमात वेडी होती एका सुपरस्टारची सासू, दुसऱ्याशी लग्न केल पण, इकडे सनीसोबत गुपचूप प्रेमसंबंध चालूच!

SCROLL FOR NEXT