coronavirus second wave 
उत्तर महाराष्ट्र

दुसरी लाट अधिक धोकादायक; सहज घेऊ नका! 

रमाकांत घोडराज

धुळे : कोरोना विषाणू संसर्गाची सध्याची लाट ही पहिल्या लाटेपेक्षा धोकादायक आहे. त्यामुळे नागरिकांनी एवढ्या सहजतेने वागू नये. लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून आवश्‍यक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, नागरिक जोपर्यंत संवेदनशीलपणे, जबाबदारीने वागत नाहीत, तोपर्यंत त्याला अर्थ नाही, कोरोनावर नियंत्रण मिळविणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे; अन्यथा स्थिती अधिक स्फोटक बनेल व त्याला आपण सर्वच जबाबदार राहू, असा सूर शनिवारी (ता.२७) महापालिकेत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत उमटला. 
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी शनिवारी (ता.२७) महापालिकेत आढावा बैठक घेतली. महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, आयुक्त अजीज शेख, स्थायी समिती सभापती संजय जाधव, डॉक्टर, वैद्यकीय संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. डॉ. भामरे म्हणाले, की तीन-चार महिन्यांपूर्वी कोरोनाबाधितांची संख्या अतिशय कमी होती. मात्र, ढिलाईमुळे पुन्हा बाधित वाढत आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट जास्त धोकादायक आहे. त्यामुळे खडबडून जागे व्हायची वेळ आली आहे. रुग्णालयांमध्ये खाटा मिळाव्यात, यासाठी नागरिक आम्हाला फोन करतात. श्री. भाऊसाहेब हिरे मेडिकलमध्येच सर्व रुग्ण जातात. त्यामुळे तेथे भार पडला आहे. यावर उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

लग्न समारंभातूनही प्रसार 
लग्न समारंभामुळे कोरोनाचा प्रसार जास्त होत असल्याचे नमूद करत प्रशासनासह लोकप्रतिनिधी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र नागरिकांना गांभीर्य नाही. त्यामुळे यापुढेही नागरिकांनी समंजसपणे विचार केला नाही तर हाहाकार उडेल व त्याला सर्वच जबाबदार असतील असा इशाराही डॉ. भामरे यांनी दिला. गंभीर स्थिती निर्माण झाली तर कठोर निर्बंध लागतील. त्यामुळे सण-उत्सवही घरातल्या घरात साजरा करा असे आवाहन डॉ. भामरे यांनी केले. 

लढाई लवकर संपणारी नाही 
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, की कोरोना विषाणूचे पाच प्रकार सध्या अस्तित्वात आहेत. हा विषाणू पहिल्या आठवड्यात लक्षणेच दाखवतच नाही. यापूर्वी ज्येष्ठ नागरिक व विविध व्याधी असलेल्या नागरिकांसाठी कोरोना धोकादायक होता. मात्र आता ३०-४० वयोगटासाठीही हा विषाणू धोकादायक बनला आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीमुळेही संसर्ग वाढल्याचे ते म्हणाले. ही सर्व परिस्थिती पाहता कोरोनाविरुद्धची लढाई लवकर संपणारी नाही. त्यामुळे थकून चालणार नाही, अधिक सजग राहण्याची गरज श्री. यादव यांनी व्यक्त केली. 

संपादन - राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Hindu AttacK: हिंदू व्यापाऱ्याला बेदम मारहाण, जीव गेल्यावर मृतदेहावर नाचले हल्लेखोर; बांग्लादेशातील अराजकता थांबेना

Nitin Gadkari and Next PM : ''म्हणून मोदींनंतर गडकरीच पंतप्रधान...''; काँग्रेस नेत्याने केलंय मोठं विधान!

Latest Marathi News Updates: "आजचा भारत अंतराळातून महत्त्वाकांक्षी दिसतो!": ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे शब्द

Gold Rate: पैसे तयार ठेवा! सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होणार? अहवालातून महत्त्वाचा खुलासा

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

SCROLL FOR NEXT