corona test
corona test 
उत्तर महाराष्ट्र

जिल्‍हाधिकारींनंतर आणखी तीनजण कोरोनाबाधित 

रमाकांत घोडराज

धुळे : जिल्हाधिकारी संजय यादव यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर धोका लक्षात घेता बुधवारी (ता.३) जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली. या चाचणीत आणखी तीनजण कोरोनाबाधित आढळले. 
दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी यादव हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना कोरोनाच्या अनुषंगाने विविध उपाययोजनांसह दक्षता घेणे, नियमांचे पालन करण्याचे तसेच आपल्या संपर्कातील व्यक्तींनीही लक्षणे आढळल्यास तत्काळ चाचणीचे आवाहन केले होते. चाचणीपूर्वी जिल्हाधिकारी श्री. यादव नियमितपणे कार्यालयात येऊन काम करत होते. त्यामुळे अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांशी त्यांचा संपर्क येणे स्वाभाविक आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.३) जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. 
 
१४३ जणांची तपासणी 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात महापालिकेच्या पथकाने अधिकारी-कर्मचाऱ्यांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, डॉ. पल्लवी रवंदळे, डॉ. प्रशांत पाटील, अमोल पाथरे, माधुरी कांबळे, उमाकांत बारी यांच्या उपस्थितीत ही करण्यात आली. एकूण १४३ जणांची चाचणी करण्यात आली, त्यातील तीनजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने येथे अनेक नागरिक येत असतात. ही बाब लक्षात घेऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितले.  

संपादन ः राजेश सोनवणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक पांड्या ऑन फायर! तिसरी विकेट घेत हैदराबादला दिला सातवा धक्का

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT