sarpanch reservation 
उत्तर महाराष्ट्र

धुळे तालुक्यात चार ग्रामपंचायतींचे आरक्षण ‘जैसे थे’; काहींचे स्वप्न भंगले 

एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : धुळे तालुक्यातील १३१ ग्रामपंचायतींचे आरक्षण गुरुवारी (ता. २८) तहसील कार्यालयात तहसीलदार गायत्री सैंदाणे यांच्या देखरेखीखाली चिठ्ठ्या टाकून काढण्यात आले. सात ग्रामपंचायती अनुसूचित जाती, २३ ग्रामपंचायती अनुसूचित जमाती, ३६ ग्रामपंचायती इतर मागासवर्गीय आणि ६१ ग्रामपंचायतीत सर्वसाधारण सरपंचपदाचे आरक्षण असून, चार ग्रामपंचायतींचे आरक्षण ‘जैसे थे’ ठेवल्याने धुळे तालुक्यात १३१ पैकी १२७ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर झाले. 
सरपंच आरक्षण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जाहीर होत असल्याने गावोगावी आधीच नाराजी असताना, आरक्षणामुळे काहींचे स्वप्न भंग पावले. सोयीचे आरक्षण न निघाल्याने सदस्यपदासाठी केलेला खर्चही वाया गेला. सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱ्यांना फटका बसला. काही मोठ्या गावांत राजकारण पालटले आहे. 

सरपंच आरक्षण असे 
अनुसूचित
जमाती- नगाव, तिसगाव, वडेल, ढंढाणे, जापी, नंदाळे बुद्रुक, हडसुणे, वडगाव, निमडाळे, रामी. 
नागरिकांचा मागास प्रवर्ग- अजनाळे, पाडळदे, धमाणे-धोडी, नाणे, सांजोरी, बोरसुले-नवेकोठारे, कावठी, खेडे-सुट्रेपाडा, बांबुर्ले प्र. नेर, निमगूळ, धनूर-लोणकुटे, बल्हाणे, भदाणे, न्याहळोद, देऊर खुर्द, पुरमेपाडा, लळिंग-वार वाणमळा, नांद्रे-पुनीतपाडा, विसरणे, रानमळा, तामसवाडी-हेंकळवाडी, आमदड- वजीरखेडे, बोरीस, शिरधाने प्र. डा, सायने, नेर, कुंडाणे-वार, लामकानी, धाडरे, नवलाणे, धाडरी, अंचाळे तांडा, मोरशेवडी, गोंदूर, अजंग-कासविहीर, कौठळ. 
सर्वसाधारण- अकलाड, आर्णी, आंबोडे, काळखेडे, कुंडाणे-वरखेडी, कुसुंबा, कुंडाणे-वेल्हाणे, गरताड, जुन्नेर, दह्याणे, दापुरा-दापुरी, देवभाने, देऊर बुद्रुक, नावरी, नंदाळे खुर्द, नंदाणे, बिलाडी, बोधगाव-वणी खुर्द, बोरविहीर, बोरकुंड, रतनपुरा, मोरदड, मोहाडी प्र. डांगरी, मांडळ, लोणखेडी, वडजाई, वेल्हाणे बुद्रुक, सडगाव-हेंकळवाडी, सिताणे, हेंद्रूण, कुंडाणे तांडा, नवलनगर, निमखेडी, बाबरे, चौगाव-हिंगणे, विश्वनाथ-सुकवड, पिंपरखेडे, होरपाडा, सावळदे, उभंड, तरवाडे, रावेर, बुरझड, आनकवाडी, शिरूड, नरव्हाळ, धामणगाव, फागणे, भिरडाणे-भिरडाई, वार, वडणे, मेहरगाव, तिखी, लोहगड, सातरणे, मोरदड तांडा, बेहेड, विंचूर, आर्वी, निकुंभे, बाभूळवाडी. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT