narmada parikrama
narmada parikrama 
उत्तर महाराष्ट्र

पायी नर्मदा परिक्रमा ९९ दिवसांत पूर्ण 

दगाजी देवरे

म्हसदी (धुळे) : येथील कीर्तनकार, प्रबोधनकार सतीलाल महाराज देवरे यांनी ९९ दिवस तीन हजार १०० किलोमीटर अंतर पायी चालत पदयात्रा पूर्ण केली आहे. सोमवारी (ता. २२) महाराजांचे गावात आगमन झाल्यावर ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. देवरे महाराज व ग्रामपुरोहित गणू महाराज यांची गावभर मिरवणूक काढली. 
कळसधारी मुली, महिलांनी मिरवणुकीची शोभा वाढविली. हर हर नर्मदेचा गजर करत प्रत्येक घरी महिलांनी औक्षण केले. सायंकाळी महाप्रसादवाटप झाले. रात्री युवराज महाराज आळंदीकर यांचे कीर्तन झाले. देवरे महाराज १९९९ पासून कीर्तनातून समाजप्रबोधन करत आहेत. त्यांनी सुमारे तीन हजार ५०० पेक्षा अधिक कीर्तने केली आहेत. ते महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत. खडतर समजली जाणारी नर्मदा परिक्रमा त्यांनी पायी पूर्ण करीत आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात व झारखंड राज्यातून खडतर प्रवास केल्याची माहिती त्यांनी दिली. 

तीन हजार १०० किमी अंतर
नर्मदेचा उगम अमरकंठ येथे असून, नर्मदेला ९९९ उपनद्या, हजारो मंदिरे, साधू-संतांचे आश्रम तसेच हजारो घाटांचे प्रत्यक्ष दर्शन घडत असल्याचे ते सांगतात. परिक्रमेत शूलपाणी, लक्कडकोट, चव्यन, दमघड, अमरकंठ वनक्षेत्राशिवाय शेकडो पर्वतांना वळसा घालावा लागत असल्याचे ग्रामस्थांशी संवाद साधताना सतीलाल महाराज यांनी स्पष्ट केले. ते लहानपणापासूनच पांडुरंगाचे निस्सीम भक्त असून, खरा वारकरी सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिसरात परिचित आहेत. त्र्यंबकेश्वर व पंढरपूरच्या दिंडीत त्यांचा सहभाग असतो. आयुष्यात एकदातरी अतिशय कठीण समजली जाणारी नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा त्यांच्या मनी होती. त्यांनी ती ४९ व्या वर्षी पूर्ण केली. इच्छाशक्ती व भक्तीच्या जोरावर त्यांनी नर्मदा परिक्रमेचा तीन हजार १०० किलोमीटरचा पायी प्रवास तीन महिन्यांत पूर्ण केला. साधारणत: ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागतो. रोज ४० ते ५० किलोमीटरचा पायी प्रवास करून नर्मदा परिक्रमा तीन महिन्यांत पूर्ण केली. 
 
नवसपूर्तीसाठी परिक्रमा नव्हती. गावात सौख्य नांदावे, ग्रामस्थांना आरोग्य लाभावे म्हणून ही परिक्रमा होती. सर्व ग्रामस्थांनी कौतुक केले, परिक्रमा साध्य झाली. 
-सतीलाल महाराज 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT