ganja 
उत्तर महाराष्ट्र

कपाशीच्या शेतातील गांजा पोलिसांनी शोधला; दोन क्‍विंटल माल जप्त

सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : महादेव दोंदवाडा (ता.शिरपूर) येथील सोनज्या पाड्यातील गांजाची शेती सांगवी पोलिसांनी उध्वस्त केली. 26 जानेवारीला केलेल्या कारवाईत दोन क्विंटलहून अधिक ओला गांजा पोलिसांनी जप्त केला. एका विरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
दुर्गम भागातील अतिक्रमित वन जमिनीत सुरु असलेल्या गांजा लागवडी विरोधात सांगवी पोलिसांनी व्यापक मोहीम सुरु केली आहे. त्याअंतर्गत टेहळणी करुन खबऱ्यांचे जाळे तयार करुन माहिती गोळा केली जात आहे. महादेव दोंदवाडा शिवारात सोनज्यापाडा येथील कपाशीच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती सहायक निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली. त्यांनी सांगवी वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद मेश्राम व सहकाऱ्यांना सोबत घेऊन 26 जानेवारीला रात्री नऊला संशयित गेंदाराम झिपा पावरा याच्या शेतावर छापा टाकला. 

चार लाख किंमतीचा गांजा
पोलिसांना पाहून संशयित अंधारात फरार झाला. शेतात चार ते सहा फूट उंचीची गांजाची झाडे आढळली. पोलिसांनी झाडे तोडून जप्त केली. त्यांचे वजन दोन क्विंटल पाच किलो 700 ग्रॅम असून एकूण किंमत चार लाख 11 हजार 400 रुपये आहे. हवालदार हेमंत पाटील यांनी दिलेल्या माहितीवरुन सांगवी पोलिसांनी संशयित गेंदाराम पावरा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. हवालदार लक्ष्मण गवळी, योगेश दाभाडे, मोरे, पवार आदिंनी ही कारवाई केली.  

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashmir Encounter: मोठी बातमी! भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोघांचा खात्मा, कुठे घडली घटना?

Rupali Chakankar: चाकणकर-ठोंबरेंमध्ये वाद का पेटला? पक्षाने धाडलेल्या नोटिशीत नेमकं काय?

Maharashtra Politics: भाजपचा मास्टरस्ट्रोक! उद्धव ठाकरेंचा बडा नेता कमळ हाती घेणार, निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग

Jobs : फक्त एक मुलाखत अन् तुम्ही बनाल सरकारी अधिकारी! भारत सरकारच्या कंपनीत 15-16 नोव्हेंबरला वॉक-इन इंटरव्यू; अर्ज कसा करायचा पाहा

Junnar Leopard : माणिकडोह निवारा केंद्रात क्षमता संपली; आता सध्या ६७ बिबटे; मागील २५ वर्षात ५६ नागरिकांचा मृत्यू!

SCROLL FOR NEXT