Talathi bribe case
Talathi bribe case sakal
उत्तर महाराष्ट्र

२५ हजाराचा लाच..तलाठीसह पंटर जाळ्यात

सकाळ डिजिटल टीम

चिमठाणे (धुळे) : अमळथे (ता. शिंदखेडा) येथील प्रभारी तलाठी व खासगी पंटर यांनी वाटणी प्रकरण तयार करून ते तहसीलदारकडे पाठविण्यासाठी ४० हजार रूपयांच्‍या लाचेची (bribe case) मागणी केली होती. शिंदखेडा येथे २५ हजाराची लाच स्विकारतांना धुळे लाचलुचपत विभागाने (Dhule Bribery Division) तलाठी व पंटरला रंगेहात पकडले. (dhule-news-Talathi-caught-in-ACB-net-while-accepting-bribe)

आच्छी येथील पुरूष तक्रारदार (वय ४४) यांची आच्छी गावशिवरात आई– वडीलांचे नावे असलेली शेत जमिनी आहे. सदर जमिनीचे तक्रारदार यांचे भावंडांमध्ये वाटणी प्रकरण तयार करून ते शिंदखेडा तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यासाठी अमळथे सजाचे प्रभारी तलाठी नवनीत खंडेराव पाटील (वय ३२, रा शिरपूर) यांनी ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

२५ हजाराचा पहिला हप्‍ता

तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. त्‍यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता. या कारवाई दरम्यान २५ हजार रुपयांचा (पहिला हप्ता) स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी खाजगी पंटर संतोष रमेश भदाणे (वय ३६, रा.आमळथे) यांच्या हस्ते स्‍वीकारली. यावेळी लाचलुचपत पथकाने पंच व साक्षीदार समक्ष सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी यांना ताब्यात घेतल्यानंतर आज धुळे जिल्हा न्यायालयात हजर केले आसता उद्यापर्यंत (ता.१७) पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सापळा पथकातील कृष्णकांत वाडीले, राजन कदम, प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, चालक सुधीर मोरे आदींनी कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

CM Eknath Shinde : त्यांच्यासोबत पाकिस्तानची बोली बोलणारे बसतात; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

RCB vs DC Stale Food : कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अडचणीत वाढ; आरसीबी - दिल्ली सामन्यात शिळं जेवण दिल्याप्रकरणी FIR दाखल

Latest Marathi News Live Update : कोकणातील खेड मध्ये गारा पडल्या

SCROLL FOR NEXT