watermelon
watermelon watermelon
उत्तर महाराष्ट्र

लाखभर भाडे देवून टरबूज नेले दिल्लीला अन्‌ झाली फसगत!

सकाळ डिजिटल टीम

कापडणे (धुळे) : कोरोना लॉकडाउनमुळे (Coronavirus lockdown) सर्वच व्यवसायांची वाट लागली आहे. भाजीपाला फळ उत्पादक शेतकऱ्यांची ((Farmer) तर पुरतीच वाट लागली आहे. ‘टु बी ऑर नॉट टु बी’ हा त्यांच्या समोरचा अनुत्तरीत प्रश्न आहे. येथील निवृत्त शिक्षकाने टरबूजला (watermelon) भाव मिळेल या आशेने स्वतः थेट दिल्लीलाच नेले. गाडीचे लाखभर भाडे देवून काढणीचा खर्चही निघाला नाही. त्यातच दलालाने महिना उलटूनही रक्कम न दिल्याने फसवणूक झाली आहे. शेतात या अन्‌ मोफत टरबूज न्या, अशी म्हणण्याची वेळ टरबूज उत्पादकांवर आली आहे. (watermelon taken to delhi farmer and merchant fraud)

गाडी भाडे एक लाख सोळा हजार

प्रकाश पाटील यांनी मुदत पुर्व निवृत्ती घेतली आहे. पंधरा वर्षांपासून शेतीत राबत आहेत. मजूरांना मजूरी मिळेल या उद्देशाने ते शेती करीत आहेत. लॉकडाउनमध्ये टरबूज उत्पादकांची वाट लागली आहे. दलालाच्या दूरध्वनीमुळे ते ट्रकने वीस टन टरबूज दिल्लीला घेवून गेले. भाडे १ लाख १६ हजार दिले, गाडी पोहचली. अन्‌ लॉकडाउन कडक झाले. दलालाने हात वर करून दिले. गुरुजी त्याच्याशी लढलेत. अण्णा हजारे यांचा अनुयायी आहे. येथेच उपोषणाला बसेल, असे धमकावले. त्याने भाव निम्यावर आणले. वीस टनचे एक लाख सत्तर हजार झाले. रक्कम ड्राफ्टने पाठवितो, असे सांगून पाटील यांना परतविले. आता मात्र व्यापाऱ्याने मोबाइल बंद केला आहे. गुरुजी लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर पुन्हा दिल्ली दरबारी पोहचणार आहेत.

तीस टन माल फेकला गेला

पाटील यांचा तीस टन टरबूज फेकला गेला आहे. ज्या ज्या व्यापार्‍यांनी नेलेत. त्यांनी रक्कमाच अदा केलेल्या नाहीत. आता गुरुजी स्वतःच गावोगावी जात टरबूज विकू लागले आहेत. टरबूजचे उत्पादन परवडणारे आहे. मात्र यावर्षी लॉकडाउन व भाव अभावी टरबूज मातीमोल झाल्याचे उत्पादकांनी सांगितले.

शेती करणे हा माझा छंद आहे. ऊस, केळी, द्राक्षे, बोर, लिंबू, टरबूज आदी फळ बागायतीचे प्रयोग यशस्वी झालेत. उत्पादन विक्रमी काढतो. पण भावच मिळत नसल्याची खंत आहे. रस्त्यावर टरबूज विकूनही परवड नाही. शासनाने शेतीसाठी अनुदान उपलब्ध करावे, तरच शेतकरी वाचेल.

- प्रकाश पाटील, निवत्त शिक्षक तथा शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs PBKS : राजस्थान आज प्ले ऑफमध्ये जाणार की पंजाब देणार पराभवाचा धक्का... प्रीती झिंटाच्या संघाचा कर्णधार कोण?

RBI Monetary Policy: महागाईमुळे RBIची चिंता वाढली; तुमचा EMI कमी होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

माधवी राजे शिंदे काळाच्या पडद्याआड! केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य यांना मातृशोक, दिल्लीपासून मध्य प्रदेशात शोककळा

Nagpur Crime : कुलर कंपनीच्या मालकाची २० लाखांची फसवणूक ; व्यवस्थापकाने बनावट कुलर बनवून विकले

Praful Patel : जिरेटोपावरुन प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, अशी कोणतीही गोष्ट मनात...

SCROLL FOR NEXT