Marathi esakal
उत्तर महाराष्ट्र

धुळे जिल्ह्यात मराठी नामफलकाचा अधिनियम लागू

राज्यातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करण्यासाठी नामफलक मराठी देवनागरी लिपीत लावण्याबाबतचा अधिनियम जारी करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : राज्यातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करण्यासाठी नामफलक मराठी देवनागरी लिपीत लावण्याबाबतचा अधिनियम जारी करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार धुळे जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक लावणे अनिवार्य असणार आहे अशी माहिती सरकारी कामगार अधिकारी अ. ज. रुईकर यांनी दिली.

राज्यातील सर्व व्यावसायिक दुकाने व आस्थापनेचे नामफलक मराठी भाषेत असण्याकरिता शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकाने व आस्थापनेचा किंवा ज्या आस्थापनेला कलम- ७ लागू आहे. त्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे आवश्यक असणार आहे. तसेच अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडे देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतात. मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरवातीलाच लिहिणे आवश्यक असून मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही.

याचीही नोंद घ्या

तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते किंवा मद्य विकले जाते, अशा आस्थापनांच्या नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड-किल्ल्यांची नावे लिहिणार नाही याची आस्थापना मालकांनी नोंद घ्यावी. या अधिसूचनेची जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना मालकांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी श्री. रुईकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या आता फक्त विनंती बदल्या! राज्य सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनाला यश

Maruti Suzuki Car Rate: मारुती सुझुकीच्या गाड्या महागणार! ३० हजार रुपयांपर्यंत दरवाढ होणार; पण कधीपासून? जाणून घ्या...

GT vs CSK Live: साई सुदर्शन-शुभमन गिलचा वर्ल्ड रेकॉर्ड! यांच्याशी जो नडला, त्याला यांनी गाडला; IPL मधील सर्वात यशस्वी ओपनर्स...

Eknath Shinde Photo Removed Ichalkaranji : इचलकरंजी महापालिकेतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशिल माने यांचे छायाचित्र हटविले; शिवसेना आक्रमक

GT vs CSK Live: शुभमन गिल Out असूनही मैदानावर उभा राहिला, चेन्नईचा तिथेच कार्यक्रम झाला; गुजरातच्या कर्णधाराने मोडले अनेक विक्रम

SCROLL FOR NEXT