police arrested police arrested
उत्तर महाराष्ट्र

महिला तलाठीस मारहाण; तिघांना अटक

महिला तलाठीस मारहाण; तिघांना अटक

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबार : गौण खनिज तपासणी पथकाशी वाद घालून महिला तलाठ्यास मारहाण (Leady officer hitting case) केल्याप्रकरणी तिघा संशयितांना रात्री उशिरा अटक (Nandurbar police) करण्यात आली. यामुळे तलाठी संघाकडून बेमुदत कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले. सोमवार (ता. ७)पासून कामकाज सुरळीत होण्याची शक्यता आहे. (nandurbar-leady-officer-hitting-palika-member-case-police-arested-three-porson_

शनिवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी नंदुरबार तहसील कार्यालयाकडून नियुक्त केलेले गौण खनिज तपासणी पथक वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करीत होते. वाहनातील (एमएच ३९, एडी ०९६६) चालकास वाळू वाहतुकीबाबत दहा टक्के खनिज विकास निधीबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे पास आढळून आले नाही. यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांनी वाहन तहसील कार्यालयात नेण्यास सांगितले. मात्र, चालक वाहन तेथेच सोडून पसार झाला. दरम्यान, दीड तासानंतर मालक गौरव चौधरी, चालक व काही जणांनी येऊन पथकातील कर्मचाऱ्यांशी वाद घालून वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पथकातील कर्मचाऱ्यांनी वाहनाचा पाठलाग करून मिरची पथारीजवळ वाहन अडविले. गौरव चौधरी व तलाठी निशा पावरा यांच्यात या वेळी वाद झाला. नगरसेवक गौरव चौधरी यांनी तलाठी निशा पावरा यांना शिवीगाळ करून मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप श्रीमती पावरा यांनी केला. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिसांत अनुसूचित जाती-जमाती कायद्याचा भंग, विनयभंग तसेच सरकारी नोकरावर हल्ला आदी कलमांन्वये गुन्हा दाखल झाला.

तलाठी संघाचे कामबंद

या प्रकरणातील तिघा संशयितांना अटक करावी, अशी मागणी आदिवासी संघटनांनी केली होती. तसेच नंदुरबार तालुका तलाठी संघाकडून तिघांना अटक होईपर्यंत कामबंदचा निर्णय घेतला. याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले होते. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत संशयित गौरव चौधरी, काशीनाथ गुरव व शुभम जाधव यांना अटक केली.

अटकेनंतर आंदोलन मागे

कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा भंग होईल, असे वर्तन करू नये. तसेच सद्यःस्थितीत कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून मनाई आदेश तसेच जमावबंदीचे आदेश लागू असल्याने नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी केले. दरम्यान, तिघा संशयितांना अटक करण्यात आल्याने तलाठी संघाकडून बेमुदत कामबंद आंदोलन स्थगित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panvel to Karjat: आता पनवेल ते कर्जत प्रवास फक्त एक तासात होणार, नवीन रेल्वे प्रकल्प अंतिम टप्प्यात, सेवा कधी सुरू होणार? वाचा...

'तुमच्या जाण्यानंतर आयुष्य थांबल्यासारखं वाटतय..' प्रार्थना बेहरेला पितृशोक, अपघातात झाला मृत्यू, बाबांसाठी भावूक झाली अभिनेत्री

Panvel News: उत्सव काळात स्वच्छतेचा जागर! पनवेल पालिकेची यंत्रणा रात्रपाळीमध्ये कार्यरत

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा दणका! अवघ्या दोन तासात ९५ मि.मी.पावसाची नोंद

Daily Walking Health: रोज चालण्याने 'हे' 5 आजार होणार छूमंतर, पोषणतज्ज्ञ सोनिया नारंग यांचा खास व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT