उत्तर महाराष्ट्र

एकाच महिन्यात २८ हजारापेक्षा जास्त गुन्हे दाखल; ४३ लाखाचा दंड

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबार : कोरोना महामारीच्या कालावधीत ‘ब्रेक द चेन’ (Break the chain) अंतर्गत शासन- प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द पोलीस विभागाकडून Nandurbar police cases lockdown rule not follow) फक्त मे या एक महिन्यातच २८ हजार ८३ पेक्षा जास्त गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्या गुन्ह्यातंगर्त नागरिकांकडून विविध प्रकारच्या दंडापोटी ४३ लाखाचा दंड वसुल करण्यात आलेला आहे. ही सर्व रक्कम आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे जमा करण्यात आली आहे. (nandurbar-news-lockdown-rules-not-follow-police-action-one-month-28-thousand-cases)

कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असतांना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड (Nandurbar collector rajendra bharud) व पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी कोरोना निंयंत्रणासाठी शासनाच्या आदेशाचे पालन करीत विविध उपाययोजना राबवून जिल्ह्यात कोरोनाला थोपविण्याचा प्रयत्न केला. असे असतांना शासन- प्रशासनाचे आदेश व कायद्याचे उल्लंघन करून हुल्लडबाजी कणाऱ्यांवर पोलिसांना कारवाईचा बडगा उगारावा लागला. जिल्हा पोलिस अधिक्षक श्री. पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी व ग्रामीण भागात पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मे महिन्यात धडक मोहीम राबविली. त्यामुळे केवळ एकाच महिन्यात २८ हजार ८३ गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच नियमांचे उल्लघन करणाऱ्यांकडून दंडापोटी ४३ लाखाचा रक्कम वसुल करण्यात आली आहे. एकाच महिन्यात मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंदवून एवढी दंडाची रक्कम वसुल करण्याचे काम पोलिस विभागाने केले आहे. यावरूनच पोलिस विभागाकडून कोरोना काळात कर्मचारी आपला जीव धोक्यात घालुनीही सेवा बजावत आहेत.

मे महिन्याच्या कालावधीतील कारवाई

कारवाईचा प्रकार... गुन्हे संख्या...दंडाची रक्कम

विनामास्क.........१३,६४१....... २७,२८,२००

आदेशाचे उल्लंघन...५२८..........५२,५००

सार्वजनिक थुंकणे....६६१...........१,३२,२००

उघडी दुकाने.........१६७............१,११, ९००

दळणवळण साधने...१२,०६३......१०,९३,६००

फिजिकल डिस्टन्सिंग..९०६..........१,८१,२००

तीन लग्‍न समारंभांवर कारवाई

वेळेव्यतिरिक्त दुकाने उघडे ठेवण्याबाबत ४० गुन्हे दाखल करण्यात आले असून ६५ दुकाने सिल करण्यात आली आहेत. तर विनापरवानगी व २५ पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत करण्यात येणाऱ्या लग्नासंदर्भात एकूण ३ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यात एकूण २० जणाविरुद्ध कोर्टात खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. संचारबंदीच्या एकूण ७० केसेस करण्यात आल्या असून त्यांचेही खटले कोर्टात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कारवाईत पोलीस विभागाकडून वसूल करण्यात आलेल्या दंडाची रक्कम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात जमा करण्यात आली आहे .अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update : हायअलर्ट! पुढील 48 तास 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज

...तर खत-बियाणे दुकानांचे परवाने रद्द! शेतकऱ्यांना लिंकिंगचा आग्रह, ज्यादा दराने व मुदतबाह्य खतविक्री नकोच; शेतकऱ्यांनी ‘हा’ क्रमांक जपून ठेवावा

41 लाख विद्यार्थी गणवेशाविनाच शाळेत! गणवेशाचे कापड 30 जिल्ह्यांना अजूनही मिळालेच नाही; अवघ्या ‘या’ 6 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठीच मिळाले कापड

NCERT Syllabus : सकारात्मक विचारांची पिढी घडवायची आहे;गुजरात दंगल, बाबरी मशिदीचा उल्लेख वगळल्याबाबत सकलानींचे प्रतिपादन

Latest Marathi Live Updates : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला 'ब्रेक'; राज्यात पावसाचा जोर ओसरला

SCROLL FOR NEXT