independence monument 
उत्तर महाराष्ट्र

‘स्‍वातंत्र्य स्‍मारक’ उभारणी.. डेडालाइन पाळणार की टळणार?

सम्राट महाजन

तळोदा (नंदुरबार) : रावलापाणी येथील ‘स्वातंत्र्य स्मारकाच्या’ कामाला सुरवात झाली. मात्र तेथील भौगोलिक परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिलेल्या डेडलाइनमध्ये स्मारकाचे काम पूर्णत्वास नेणे बांधकाम विभाग व ठेकेदारांपुढे मोठे आव्हान असेल. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास पावसाळ्यात तिथे काम करणे अवघड होणार आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत बांधकाम विभाग व ठेकेदाराला दिलेल्या डेडलाइनमध्ये काम पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे. 

स्वातंत्र्याचा लढ्यात आदिवासी बांधवांचा प्रत्यक्ष सहभाग व त्यांचे बलिदान दर्शविणाऱ्या रावलापाणीला (ता. तळोदा) ऐतिहासिक असे महत्त्व आहे. त्यामुळे स्वातंत्र्य योगदानातील स्मृती म्हणून तेथे स्वातंत्र्य स्मारक उभारण्याचे निश्चित करीत या कामासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र स्मारकाचे काम अतिशय संथगतीने करण्यात येत होते. 

कामाला प्रत्यक्षात सुरवात 
स्मारकाच्या कामात होत असलेली दिरंगाई लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुरूड हे ६ जानेवारीला रावलापाणीला गेले. त्या वेळी त्यांनी पाहणी करीत मकरसंक्रांतीपासून कामाला गती देत हे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला व ठेकेदाराला दिल्या होत्या. जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी निर्देश दिल्यानंतर स्वातंत्र्य स्मारकाचा कामाला खऱ्या अर्थाने वेग आला. त्यानंतर स्मारकाच्या ठिकाणी जमिनीचे व्यवस्थित सपाटीकरण करण्यात आले असून, त्याठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. आता स्लॅब टाकण्याची तयारी सुरू असून, जमिनीची लेव्हलिंग व्यवस्थित झाल्यावर त्याठिकाणी स्वातंत्र्य स्मारक उभारण्यात येणार आहे. 

संबंधित विभाग, ठेकेदारापुढे आव्हान 
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी घालून दिलेल्या ३१ मेच्या डेडलाइनमध्ये स्मारकाचे काम पूर्ण करणे संबंधित विभाग व ठेकेदारापुढे एक मोठे आव्हान ठरणार आहे. कारण रावलापाणीची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता त्याठिकाणी सिमेंट, वीट, स्टील व इतर बांधकांम साहित्य पोचविणे मोठे अडचणीचे ठरत आहे. त्या मुळे वेळेत काम पूर्ण करणे एक मोठे आव्हान आहे. 

पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणे आवश्यक 
रावलापाणी हे दुर्गम भागात असून, स्मारकाच्या ठिकाणी पोचण्यासाठी निझरा नदी ओलांडून जावे लागते. पावसाळ्यात नदी भरून वाहते व त्यानंतरही अनेक महिने नदीचे पाणी ओसरत नाही. त्या मुळे जूनपासून पुढचे सहा-सात महिने बांधकाम साहित्य स्मारकाच्या जागी पोचविणे अशक्य बाब ठरू शकते. त्या मुळे पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३१ मेपर्यंत काम पूर्ण होणे आवश्यक आहे. 

रस्ता तयार करणे आवश्यक होते 
बनपासून पुढे रावलापाणीला जाण्यासाठी सहा किलोमीटरचा कच्चा रस्ता आहे. त्यापैकी निझरा नदीपासून पुढच्या एक ते दीड किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब आहे. त्यामुळे याठिकाणी बांधकाम साहित्यासह चारचाकी मोठे वाहन नेणे खूपच अडचणीचे ठरत असल्याचे बोलले जाते. त्या मुळे अगोदर रस्त्याचे काम करीत कामाला सुरवात केली असती तर रस्त्याची समस्या भेडसावली नसती. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT