Nandurbar education department sakal
उत्तर महाराष्ट्र

गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाची पंचसूत्री

गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाची पंचसूत्री; विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे होणार सोपे

सकाळ डिजिटल टीम

तळोदा (नंदुरबार) : जूनपासून विद्यार्थ्यांविना शाळा सुरु (Nandurbar school open) झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शिक्षण विभागाने कोरोना काळातील माध्यमिक शिक्षण गुणवत्ता वाढीची पंचसूत्री सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दिली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचू शकत नसले तरी पंचसूत्रीचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवता येणार आहे. त्यामुळे (Nandurbar zilha parishad) माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी या पंचसूत्रीचे स्वागत केले आहे, तर शिक्षकांनाही या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. (nandurbar-zilha-parishad-education-department-school-open-day)

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (Coronavirus) सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांविना सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याची परवानगी नसली तरी देखील विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची गोडी टिकून राहावी म्हणून शिक्षण विभाग व शिक्षकांनी मागील शैक्षणिक वर्षांत देखील अनेक उपक्रम राबविले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवाहात ठेवण्यास शिक्षण विभाग, शाळा व शिक्षक काहीसे यशस्वी ठरले होते.

शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी

सध्या जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. असे असले तरी प्रत्यक्ष अध्यापनासाठी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्याची शासनाने अजून परवानगी दिलेली नाही. तरी देखील शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामावून घेण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शिक्षणाचा गुणवत्ता वाढीची पंचसुत्री दिली आहे. या पंचसूत्रीच्या वापर करून शाळा व शिक्षकांनी शिक्षणाचे कार्य जोमाने सुरू ठेवण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

अशी आहे पंचसूत्री

– शाळा आपल्या दारी, ज्ञानगंगा घरोघरी ः यातून शाळेतील सर्व प्रविष्ट विद्यार्थ्यांची नोंद ठेवणे. विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विविध संपर्क प्रणालीद्वारे भेट घेणे. प्रत्यक्ष भेटीद्वारे अध्ययन-अध्यापन आढावा आठवडा तसेच मासिक भेटीत घेणे. शैक्षणिक प्रगती संदर्भात चर्चा व मार्गदर्शन तसेच पालकांशी चर्चा करणे.

– गृहाभ्यासातून वेचुया ज्ञानकण ः विद्यार्थ्यांना गुहाभ्यासातून शब्द , शब्दार्थ, वाक्ये, म्हणी, सुविचार, वाक्प्रचार, गणितीय पाढे, सूत्रांचा उपयोग, उदाहरणे, शास्त्रीय कारणे, गृह प्रात्यक्षिके देणे.

– विविध कृती निर्मिती कौशल्यातून आनंद ज्ञानप्राप्तीचा ः या उपक्रमातून विविध शब्द खेळ, शब्दकोडी, फ्लॅश कार्ड तयार करणे, कृतीयुक्त खेळ, भाषा, विज्ञान, संख्याशास्त्र, गणित विषयातील कृती सोडवणे, प्रश्न निर्मिती करणे, प्रश्न तयार करण्याचे कौशल्य तयार करणे, प्रत्यक्ष व पालक भेटीत तसेच व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे.

– वाटचाल करूया आकृतीकडून कृतिशीलतेकडे, चित्रांतून प्रात्यक्षिकांकडे ः यात विविध आकृत्या काढणे, गणित, भूगोल , विज्ञानमधील आकृत्या काढणे तसेच विविध चित्र काढून रंग काम करणे, विज्ञान प्रदर्शन करिता प्रकल्प निर्मिती करणे, हस्तकलेच्या वस्तू तयार करणे व त्याचे फोटो काढून व्हाट्सअप ग्रुप वर पाठवणे व प्रत्यक्ष भेटीत पाहणे.

– वाचन, गायन, पठन करूया, आनंददायी अध्ययनाची कास धरूया ः यात विविध बोधकथा, गोष्टी वाचन, कथाकथन, कविता, गीत गायन, चिंतन, नृत्य, कृतीयुक्त काव्यगायन, बौद्धिक, शारीरिक खेळ, योगा करणे व त्याचे रेकॉर्डिंग व सादरीकरण करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT