news game 
उत्तर महाराष्ट्र

PHOTO कॅरम, बुद्धिबळ खेळून कंटाळलात...मग आता हे खेळ खेळा 

श्रीकांत जोशी

भुसावळ : घरी बसून कुटूंबासोबत कॅरम, पत्ते, बुध्दिबळ आदी खेळ खेळुन आता अनेकांना कंटाळा यायला लागला आहे. यावर उपाय म्हणून येथील शिक्षक प्रशांत देवरे यांनी घरातील वस्तु वापरून वीस खेळ तयार केले आहेत. अतिशय सहज खेळता येणाऱ्या या खेळांचे प्रात्याक्षिक ते सोशल मिडीयावर रोज टाकत आहेत.


लॉकडाउन मध्ये कुटूंबासोबत वेळ जावा म्हणून मुलांसोबत नेहमीचे बैठे खेळ खेळण्यास सुरुवात झाली. यात कॅरम, बुध्दिबळ, पत्ते असे नेहमीचे खेळ होते. आता अनेकांना यांचा कंटाळा येऊ लागला होता. मात्र भुसावळच्या अहिल्यादेवी कन्या शाळेत शिक्षक असलेले प्रशांत देवरे यांनी अनोखे खेळ तयार केले आहेत. यात घरगुती गोल्फ या खेळात काठी, पेला, चेंडू एवढेच साहित्य लागते. पेला एका कोपऱ्यात आडवा ठेवून काठीने समोरच्या कोपऱ्यातुन चेंडू तीन टप्प्यांत ढकलत पेल्यात गेला पाहिजे. बांगड्यांवर नाणे ठेवणे या खेळात परातीत तांदूळ घेऊन त्यात दोन बांगड्या खुपसून त्यावर नाणे ठेवणे.

याव्यतिरिक्त चेंडूवर फेकून वाटीत मणी जमा करणे, चमचा गोटी किंवा हरभरा दाणे शर्यत, गोलात गोटी टाकून निशाणा लावणे, बांगड्या फिरवणे, झाकणाने पाणी भरणे आदी वीस खेळ त्यांनी आतापर्यंत तयार केले आहे. या खेळांचे प्रात्यक्षिक करण्यासाठी त्यांची पत्नी रुपाली देवरे यांचेही त्यांना सहकार्य मिळते. याबाबत श्री. देवरे म्हणाले, मुलं नेहमीचे खेळ खेळून कंटाळले की मोबाईलवर लुडो, सापशिडी आदी खेळ खेळतात. त्यांच्या हातात मोबाईल न देता कोणते खेळ देता येतील याचा विचार मी करत होतो. खरंतर मी तयार केलेले काही खेळ लहानपणी खेळलो होतो. त्याचे नवीनीकरण केले. तर काही खेळ नव्याने सुचले. लॉकडाउन संपेपर्यंत नवनवीन खेळ तयार करण्याचा मानस आहे.

या घरगुती खेळात विरंगुळा होतोच शिवाय एकाग्रता ही वाढिस लागते. माझे खेळ सोशल मिडीयाच्या माध्यमातून देशभरातील एक हजार ४५८ लोकांपर्यंत पोहचत आहे. खेळाची माहिती देताना मराठी व हिंदी भाषेचा वापर करतो. कालच नशिराबादच्या एका मित्राने माझे सर्व खेळ इंग्लंड मधील त्यांच्या नातेवाईकांना फॉरवर्ड केले.
- प्रशांत देवरे, शिक्षक, अहिल्यादेवी कन्या शाळा, भुसावळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT