residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

नाराज बिएलओ न्यायालयीन लढ्याच्या तयारीत...सोमवारी बैठक 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः राष्ट्रीय कार्याचा भाग म्हणून वर्षानुवर्षापासून प्राथमिक शिक्षकांना बीएलओ म्हणून निवडणूकीचे कामकाज दिले जाते. मात्र निवडणूकीच्या निरंतर कामामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मात्र खेळखंडोबा सुरु आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देउ नयेत हे न्यायालयाचे निर्देश असूनही प्राथमिक शिक्षकांना निवडणूक कामासाठी प्राथमिक शिक्षकांवर वारंवार जबाबदारी दिली जाते. त्यामुळे ही कामे कमी करावीत. अशी मागणी करत, आज (.21) जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने न्याय न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. 

महासंघाने निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, निवडणूक तहसिलदार प्रशांत पाटील यांना निवेदन दिले आता याप्रकरणी येत्या सोमवारी (ता.23) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे अध्यक्ष नंदलाल धांडे, कार्याध्यक्ष रमेश अहीरे, सचिव सुनिल बिरारी, मीनाक्षी गायधनी, वैशाली मोरे, पोर्णिमा पगारे, अतुल परदेशी, पुष्पा लांडगे, कल्पना पाटील, ज्योती देशमुख, दिलीप पाटील, मनोहर गायकवाड, स्वप्निल पाटील, सुवर्णा निकम आदिंसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ठराविक कामकाजासाठी हे सारे 

निवडणुक आयोगाकडून मतदार पडताळणी कार्यक्रम राबवला जातो. त्यासाठी घरोघरी जावून बीएलओंना मतदारांची नोंदणी करणे तसेच मतदार पडताळणीसाठी शिक्षकांची नियुक्ती करतांना ठराविक शाळा, ठराविक शिक्षक तसेच महिला शिक्षकांना मोठया संख्येने निवडणुकीच्या कामकाजासाठी घेतले जाते. मात्र मोठया प्रमाणावर शाळेतील शिक्षक निवडणूक कामासाठी गेल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणक्रमावर होतो. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांना निवडणूक कामकाजाबाबत अनुपस्थित राहील्यास नोटीसा बजावल्या जातात. 

ठराविकांचीच अडवणूक 
निवडणूकीच्या ड्युट्या लावतांना, त्याच त्या शाळा आणि तेच त्या शिक्षकांकडून कामे करुन घेतली जातात. असाही महासंघाचा आक्षेप आहे. शिक्षकांना त्यांच्या परिसरात व्यतिरिक्त इतर विभागात निवडणूकीचे कामकाज दिले जात असल्याने हे काम करतांना बीएलओंना अडचणी येतात. त्यांच्या अडचणी समजून न घेता काम कमी केल्यास शिक्षकांना नोटीसा बजावल्या जातात ही बाब अन्यायकारक असून प्राथमिक शिक्षकांना या कामातून वगळावे अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली. मात्र प्रशासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही न केल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशारा प्राथमिक शिक्षक संघटनेने केला. 

अशैक्षणिक कामे देऊ नये

निवडणूक कामासाठी प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. नुकसान टाळण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना अशैक्षणिक काम देउ नये ही आमची मागणी आहे. बीएलओ म्हणून महिला शिक्षकांना काम करतांना अडचणी येतात. अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून येत्या सोमवारी बैठक बोलावण्यात आली आहे. यावर तोडगा न निघाल्यास न्यायलयात धाव घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
नंदलाल धांडे, अध्यक्ष शिक्षक महासंघ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT