उत्तर महाराष्ट्र

आमदार झाले पालक...अन्‌ तहसिलदार, प्रांताधिकारांनी धरला अंतरपाठ ! 

सकाळवृत्तसेवा

उंबरखेड (ता. चाळीसगावः सध्या ‘लॉकडाऊन’मुळे विवाह समारंभ व विविध कार्यक्रमांना बंदी असल्याने ‘फिजीकल डिस्टनसिंग’चे पालन करून विवाह सोहळे उरकले जात आहेत. गावात असाच एक आदर्श विवाह पार पडला. या विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे, यात तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी वधूवरांच्या पालकाची भूमिका निभावली तर मंगलाष्टक सुरू असताना प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व तहसीलदार अमोल मोरे यांनी अंतरपाट पकडून वधूवरांच्या मामाची भूमिका पार पाडली. 

सध्या कोरोनाचे सर्वत्र सावट निर्माण झाल्याने अनेकांनी विवाह सोहळे पुढे ढकलले आहेत. मात्र, शासनाच्या नियमांचे पालन करून काही विवाह पार पडत आहेत. येथील सर्वोदय शिक्षण संस्थेचे संचालक संजय पाटील यांचे पुतणे तथा शामकांत पाटील यांचे चिरंजीव अक्षय व जवळच्या आडगाव (ता. चाळीसगाव) येथील आदर्श शेतकरी वाल्मीक पाटील यांची कन्या माधुरी यांचा विवाह जुळून आला. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वधूवरांकडील मंडळींनी मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत नियमांचे पालन करून विवाह करण्याचे ठरवले. त्यानुसार, गावातील कानुबाई मंदिरात आज विवाह ठरला. लग्नात आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित राहून वधुवराचे पालकत्व स्वीकारले. मुलीचे मामा म्हणून चाळीसगावचे प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर व मुलाचे मामा म्हणून तहसीलदार अमोल मोरे यांनी भूमिका निभावली. मंगलाष्टक सुरू असताना दोन्ही अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरून या जोडप्याचा आदर्श विवाह पार पाडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तलाठी आर. डी. नन्नवरे, पोलीस पाटील अर्चना मोरे, मुलामुलीचे आईवडील व मोजकेच नातलग उपस्थित होते. विवाह सोहळ्याला स्वतः आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शासनाचे दोन जबाबदार वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिल्याने यावेळी ‘फिजीकल डिस्टनसिंग’चे पालन करण्यात आले. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी वधूवराला भावी आयुष्याच्या शुभेच्छा देताना, या आदर्श विवाहाप्रमाणेच वैवाहिक आयुष्य देखील आदर्शवत ठेवून स्वतःसह आईवडिलांची काळजी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करून नवदाम्पत्याला वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Ticket Booking: यूजर-फ्रेंडली डिझाइन, कमी स्टेप्स आणि फास्ट बुकिंग! IRCTC संकेतस्थळाचा कायापालट, कधी होणार सुरू?

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : कामरगाव अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी नागरिक एकवटले

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

SCROLL FOR NEXT