cosmetic godavun jalgaon 
उत्तर महाराष्ट्र

"कॉस्मेटिक डिस्ट्रिब्युटर्स'चे गोदाम फोडून 19 लाख लंपास 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील शिवाजीनगरातील एस. के. ऑइल मिलसमोर राजीव अग्रवाल यांचे "सावरिया कंझ्युमर्स' हे कॉस्मेटिक डिस्ट्रीब्युटर्सचे गोदाम आहे. या गोदामाचे शटर तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व कार्यालयातील तिजोरी फोडून 19 लाख 18 हजार रुपयांची रोकड लंपास केली. 
शिवाजीनगर परिसरातील दूधफेडरेशन रस्त्यावर राजीव हरिओम अग्रवाल यांचे सावरिया कंझ्युमर प्रा. लि. नावाचे होलसेल डिस्ट्रिब्युटरचे गोदाम आहे. गोदामाला बारा कुलूपबंद शटर्समध्ये आत कार्यालय आहे. गोदामावर 35 कर्मचारी कामावर असून, मॅनेजर अमिन युनूस पटेल व कमलाकर अर्जुन सोनवणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गोदाम बंद केले होते. सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी गोदामावर आल्यानंतर कुलूप तोडलेले आढळून आल्यावर मॅनेजरने तत्काळ मालक राजीव अग्रवाल यांना दूरध्वनीवरून घटना कळविली. अग्रवाल यांनी शहर पोलिस ठाणे गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावरून डीवायएसपी निलाभ रोहन यांच्यासह पोलिस निरीक्षक अरुण निकम आणि डीबी पथक घटनास्थळावर दाखल झाले. घटनास्थळावर पाहणी केल्यानंतर संशयितांच्या शोधासाठी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

श्‍वानपथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण 
घटनेची माहिती कळाल्यावर श्‍वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरील सर्व ठसे घेण्यात आले. श्‍वान आल्यावर तोही परिसरात घुळमळला नंतर निघून गेला. 

लोखंडी तिजोरी फोडली 
चोरट्यांनी लोखंडी शटर जवळपास अडीच फूट वाकवून चोरटे आत शिरले. आतील दोन लोखंडी तिजोऱ्यांपैकी एक तिजोरी तोडून चोरट्यांनी आतील 19 लाख 18 रुपयांची रोकड चोरून नेली. सकाळी आल्यावर वाकलेले शटर आणि तोडलेल्या तिजोऱ्या दिसल्यावर कर्मचाऱ्यांसह मालकही अवाक्‌ झाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT