Dam
Dam 
उत्तर महाराष्ट्र

अक्कलपाडा’च्या उजव्या कालव्याला सोडले पाणी

सकाळ डिजिटल टीम

गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिके करपू लागली आहेत. तसेच शेतातील विहिरींनीही तळ गाठला आहे.


धुळे ः खरीपाच्या पहिल्याच पावसाने ओढ दिल्यामुळे पिके करपू (Crop Burn) लागली आहेत. अशावेळी अक्कलपाडा प्रकल्पाच्या (Akkalpada Dam) उजव्या कालव्यातून पाणी सोडून पिकांना जीवदान द्यावे, अशी मागणी आमदार कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांच्याकडे शेतकऱ्यांकडून (Farmers) झाली. त्यानुसार आमदारांच्या प्रयत्नामुळे गुरुवारी सायंकाळनंतर उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले.


पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरीही दमदार पाऊस अद्याप झालेला नाही. गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिके करपू लागली आहेत. तसेच शेतातील विहिरींनीही तळ गाठला असून, अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. अशावेळी पिकांना जीवदान मिळावे, म्हणून नेर परिसरातील शेतकऱ्यांनी उजव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी आमदार पाटील यांच्याकडे केली होती.

त्यानुसार दोन दिवसांत उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात येईल, असा शब्द आमदारांनी दिला होता. आमदार पाटील यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करत उजव्या कालव्यात तातडीने पाणी सोडावे, अशी सूचना दिली. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी प्रकल्पातील उजव्या कालव्याच्या मुख्य दरवाजाचे चक्र फिरवून गुरुवारी काँग्रेसचे आनंद पाटील यांनी पाणी सोडले.

दिलीप बिरारी, आर. के. वाघ, पांडुरंग खलाणे, प्रकाश खलाणे, साहेबराव गवळे, गणेश पाटील, मधुकर आहिरे, योगेश गवळे, डॉ. सतीश बोढरे, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता जगदीश खैरनार, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, पाणी सोडल्यामुळे नेर, देऊर, भदाणे, लोहगड, लोणखेडी, अकलाड, मोराणे येथील शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi on Pune Porsche Accident: पुणे पोर्शे दुर्घटनेवरून राहुल गांधींनी PM मोदींवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले 'दोन भारत...'

Badminton Rankings: भारताच्या सात्विक-चिरागचा बॅडमिंटनमध्ये डंका कायम! पुन्हा मिळवला नंबर वनचा ताज

अबबऽऽऽ चक्क मिळाले 100 टक्के गुण! बुद्धिबळ खेळणाऱ्या तनिषाने 100 टक्के गुण मिळवत जिंकला 'बारावी'चा डाव

Nashik Accident News: इगतपुरीच्या भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये तीन मुली व दोन मुलांचा समावेश

RR vs RCB Eliminator : कोणता रॉयल होणार 'इलिमिनेट', धडाकेबाज RCB समोर राजस्थान कामगिरी सुधारणार का?

SCROLL FOR NEXT