उत्तर महाराष्ट्र

धुळ्यात टॉसीलीझुमॅबचा काळाबाजार; इंजेक्शन विकणारे अटकेत

निखील सुर्यवंशी


धुळे : कोरोनाच्या (corona) संकटकाळात चाळीस हजाराचे टॉसीलीझुमॅब इंजेक्शन (Tocilizumab injection) काळ्याबाजारात तब्बल दीड लाख रुपयांना विक्री करणारे संशयित दोघे शहर पोलिस ठाण्याच्या ( Dhule City Police Station) जाळ्यात अडकले. त्यांना अटक झाली आहे. या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित (Superintendent of Police Chinmay Pandit) यांनी शहर पोलिस ठाण्याच्या पथकाच्या कामगिरीची प्रशंसा केली.

( dhule black market tocilizumab injection seller police arrested)

पोलिसांनी इंजेक्शनसह ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी संशयित दोघांवर गुन्हा दाखल केला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी संतोष कांबळे व शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी सापळा रचला. त्यांनी गुरुवारी (ता.६) रात्री सव्वाआठच्या सुमारास बनावट ग्राहक आताऊर रहेमान मुसाद्दीक अन्सारी यांच्या माध्यमातून मोबाईलव्दारे संशयितांशी संपर्क साधला. त्यात चाळीस हजार किमतीच्या टॉसीलीझुमॅब इंजेक्शनची मागणी केली. संशयिताने प्रत्यक्षात दीड लाख विक्रीची किंमत सांगितली. साक्री रोडवरील एका पॅथॉलॉजी लॅबसमोर ग्राहकाला बोलविले. त्यानुसार बनावट ग्राहक व पोलिस पथक घटनास्थळी पोचले. तेथे ग्राहकाला इंजेक्शन देताच पथकाने विक्रेत्याला पकडले. त्याच्याकडून ४० हजार ५४५ किमतीचे इंजेक्शन, दीड हजार रुपये रोख व पाच हजारांचा मोबाईल, असा एकूण ४७ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


या प्रकरणी पोलिस पथकाने संशयित विशाल कटारिया (वय ३६, रा. प्लॉट क्रमांक तीन, गोदाई कॉलनी, सिंचन भवनामागे, धुळे) यास अटक केली. तपासात त्याने इंजेक्शन ऋषीकेश गांगुर्डे (वय २४, रा. श्रीहरी कॉलनी, साक्री रोड, धुळे) याने दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गांगुर्डेला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश देशपांडे यांच्या फिर्यादीनुसार संशयित कटारिया, गांगुर्डेवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहराचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सहकार्याने सहाय्यक निरीक्षक संतोष तिगोटे, पथकातील शाकीर शेख, नीलेश पोतदार, मनीष सोनगीरे, प्रवीण पाटील, वाडेकर, भामरे, भदाणे, पाडवी, प्रशांत बागूल यांनी यशस्वी कारवाई केली.

( dhule black market tocilizumab injection seller police arrested)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच! न्यायालयीन कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT