shiv sena-bjp
shiv sena-bjp 
उत्तर महाराष्ट्र

धुळ्यात शिवसेना-भाजप आमने सामने : १३६ जणांवर गुन्हा दाखल

निखील सुर्यवंशी

धुळे : महाड येथे केंद्रीय सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. त्याचे तीव्र पडसाद शहरासह जिल्ह्यात मंगळवारी उमटले. यात शिवसेनेने (Shiv Sena) शहरात विनापरवानगी मंत्री राणे यांच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली, तर भाजपनेही विनापरवानगी महानगर कार्यालयाजवळ जमाव केला. यात टोकाच्या घोषणाबाजीतून एकमेकांना भिडलेल्या शिवसेना व भाजपच्या (BJP) एकूण १३६ पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात (Dhule Police) रात्री गुन्हा दाखल झाला.



पोलिस प्रशासनाने शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. त्यात शहराचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी भाजप, तर गोपनीय शाखेचे कर्मचारी भूषण खेडवन यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवसेनेच्या ३० जणांसह इतर ५० ते ६० आणि भाजपच्या २१ जणांसह २० ते २५ जणांविरुद्ध ही कारवाई झाली. संशयितांविरुद्ध विनापरवानगी जमाव, गर्दी, सरकारी कामात अडथळा, दंगल, पोलिसांनी नाकारलेल्या मार्गे गर्दी करून मनाई आदेश, जमावबंदी आदेश, कोविडसंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याने विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.


दगडफेकीत पोलिस जखमी
शिवसेनेने मंगळवारी दुपारी पाऊणला विनापरवानगी मध्यवर्ती कार्यालयापासून मंत्री राणे यांच्या निषेधार्थ त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत तिरडीसह कोंबडीचा समावेश केला. भाजप व राणेंविरोधात घोषणाबाजी करत शिवसेनेचे आंदोलक विविध मार्गे दुपारी दीडनंतर महापालिकेच्या नूतन इमारतीजवळ आले. तेथून जवळच भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांचे कार्यालय आहे. त्यावेळी भाजपच्या जमावातूनही घोषणाबाजी झाली. अशात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. पोलिसांनी पुतळा विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित जमावातील काही मंडळी अग्रवाल यांच्या कार्यालयाजवळील गर्दीच्या दिशेने धावली. त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्का देत शिवसेनेचे कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांच्या दिशेने जातच होते. यात पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावले. या घटनेत पोलिस कर्मचारी गुणवंत पाटील पायाला दगड लागल्याने जखमी झाले. यानंतर पोलिसांनी गर्दी पांगविल्याची फिर्याद खेडवन यांनी दिली. त्यानुसार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, किरण जोंधळे, महानगरप्रमुख मनोज मोरे, प्रफुल्ल पाटील, पंकज गोरे, अतुल सोनवणे, बबन थोरात, संजय गुजराथी, राजेंद्र पाटील, संजय वाल्हे, चंद्रकांत म्हस्के, राजेश पटवारी, सचिन बडगुजर, कुणाल कानकाटे, ललित माळी, राज माळी, लोकेश बडगुजर व इतरांवर गुन्हा दाखल झाला.

shiv sena-bjp

काहींचा पोलिसांना धक्का
उपनिरीक्षक पाटील यांच्या फिर्यादीनुसार भाजपचे माजी महापौर चंद्रकांत सोनार, शहराध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर भगवान गवळी, प्रदीप कर्पे, भिकन वराडे, देवा सोनार, सिध्दार्थ बोरसे, रोहित चांदोडे, ओम खंडेलवाल, पप्पू ढापसे, हर्ष रेलन, विकी परदेशी, चेतन मंडोरे, नरेश चौधरी, अमोल सूर्यवंशी, राहुल तारगे, नागसेन बोरसे व इतरांनी अग्रवाल यांच्या कार्यालयाजवळ गैरकायद्याने जमाव करत घोषणाबाजी केली. त्यावेळी शिवसेनेची प्रतिकात्मक अंत्ययात्रा महापालिका इमारतीजवळ आली. त्यावेळी भाजपच्या जमावातील काही जण महापालिकेच्या दिशेने धावले. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांना धक्का दिला. तसेच गर्दीतील काही जणांनी दगडफेक केल्यावर उपनिरीक्षक पाटील यांच्या पायाला लागून ते जखमी झाले. नंतर पोलिसांनी गर्दी पांगविली. त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याचे नमूद आहे.


पोलिस फक्त पाहत राहिले : अग्रवाल
शिवसेनेच्या गुंडांनी भाजप कार्यकर्त्यांच्या दिशेने काठ्या भिरकावल्या, दगड फेकले. त्यावेळी बंदोबस्तावरील पोलिस केवळ पाहात राहिले, असा गंभीर आरोप भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी केला. केंद्रीय मंत्री राणे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढणे ही निषेधार्ह बाब आहे. शिवसेना भाजपला भिडली. त्यांचा प्रतिकार करण्यासाठी भाजप भक्कम आहे. शिवसेनेची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असे अग्रवाल म्हणाले.

shiv sena-bjp

shiv sena-bjp
भाजपकडून मुख्यमंत्र्यांना अवमान : माळी
केंद्रीय मंत्री राणे घटनात्मक मुख्यमंत्री पदाचा अवमान करत आहेत. राणेंना भाजप पोसत आहे. ते आक्षेपार्ह विधानातून सामाजिक तेढ निर्माण करत आहेत. ते भावना भडकवत असतील तर शिवसेना ते कदापी खपवून घेणार नाही. राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला महापालिकेजवळ अग्निडाग दिल्याने मनपा सत्ताधारी भाजपला दुःख झाल्याने, ही घटना जिव्हारी लागल्याने ते शिवसेनेला भिडले, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी म्हणाले.

पोलिसांमुळे सर्व काही सुरळीत
या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित म्हणाले, की धुळ्यात शिवसेनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले होते. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडण्याआधी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने सर्व काही सुरळीत झाले. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. धुळे शहर व जिल्ह्याच्या शांततेला बाधा येऊ नये म्हणून कुणीही अफवांवर विश्‍वास ठेऊ नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

SCROLL FOR NEXT