उत्तर महाराष्ट्र

धुळे शहर कोरोनामुक्तीसाठी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केंद्रे सुरू

रमाकांत घोडराज

धुळे ः कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्या. त्याला नागरिकांचाही प्रतिसाद मिळाल्याने शहरात कोरोना नियंत्रणात येत आहे. यापुढील काळात धुळे शहरातून कोरोनाच्या उच्चाटनासाठी प्रयत्न आहेत. दिवाळीत बाजारात गर्दी होत असून, संसर्गाचा धोका टाळण्याच्या अनुषंगाने शहरात पाच ठिकाणी तात्पुरती रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केंद्रे सुरू केली आहेत. या ठिकाणी नागरिकांनी नमुने तपासणीसाठी पुढे यावे, असे आवाहन महापौर चंद्रकांत सोनार यांनी केले. 

वाचा- कोरोनायोद्ध्यांनी सामाजिक दातृत्वाचे दर्शन घडविले- मंत्री पाटील - 

मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांच्या कोरोना टेस्टसाठी महापालिकेने शहरात पाच ठिकाणी रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केंद्रे सुरू केली. महात्मा गांधी पुतळ्याजवळील एका केंद्राचे महापौर सोनार, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, आयुक्त अजीज शेख यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन झाले. नगरसेवक देवेंद्र सोनार, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोर आदी उपस्थित होते. 


महापौर सोनार म्हणाले, की आयुक्त शेख, सभापती बैसाणे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे धुळे शहरात कोरोनावर आपण नियंत्रण मिळवू शकलो. भविष्यात कोरोनाचा शंभर टक्के नायनाट करण्यासाठी आता प्रयत्न आहेत. ॲन्टिजेन टेस्ट केंद्रात अवघ्या दोन मिनिटांत स्वॅब घेऊन संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, हे समजू शकणार आहे. यामुळे कोरोनामुक्तीसाठी नागरिकांनी स्वॅब द्यावेत, असे आवाहनही श्री. सोनार यांनी केले. 

आयुक्त शेख म्हणाले, की दिवाळीसह इतर विविध कारणांनी बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. अनेक जण मास्क न वापरता फिरत आहेत. महापालिका प्रशासन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत आहेत. असे असले तरी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात अडचण येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने रॅपिड ॲन्टिजेन टेस्टची पाच केंद्रे सुरू केली आहेत. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी ही केंद्रे सुरू केली आहेत. बाजारात मास्क नसलेल्या नागरिकांना महापालिकेचे कर्मचारी पकडून आणतील व त्यांची कोरोना टेस्ट घेतील. संबंधित व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली, तर तिला उपचारासाठी पाठविले जाईल. धुळे शहर कोरोनामुक्तीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. शेख यांनी केले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Uddhav Thackeray meeting : उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टींच्या भेटीमागे दडलय काय?, यासाठी शेट्टींनी दिली ठाकरेंना हाक

US-इराण युद्धात लहानसा देश मालामाल, होर्मुझ बंदचा फायदा; एका जहाजासाठी मिळतायत ३३ कोटी

Satara Gram Panchayat Elections : 874 ग्रामपंचायतींची रणधुमाळी लांबणीवर? मे-जूनमध्ये निवडणूक होणे का आहे अशक्य? प्रशासकीय हालचालींना वेग

UP: ‘काला नमक’ तांदूळ परदेशात सुपरहिट! 400 रुपये किलोने सिंगापूरमध्ये विक्री, भगवान बुद्धांशी खास कनेक्शन!?

Online Gaming Rules : 1 मे पासून 'या' ऑनलाइन गेम्सवर बंदी; एक चूक अन् थेट कारवाई, कोणाला मिळणार सूट? सरकारचा मोठा निर्णय पाहा

SCROLL FOR NEXT