mask  
उत्तर महाराष्ट्र

अबब.. थुंकणाऱ्यांना 11 हजार; मास्क नसलेल्यांना 22 हजार दंड 

सकाळ वृत्तसेवा

धुळे : "कोरोना' विषाणूंचा धोका टाळण्यासाठी महापालिकेने मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक केले आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासही मनाई केली असून, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यात आतापर्यंत केवळ रस्त्यावर थुंकणाऱ्या 110, मास्क न लावणाऱ्या शंभरावर नागरिकांकडून तब्बल 33 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. 


कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मास्क अथवा तोंडाला रुमाल न बांधणाऱ्यांना 200 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना प्रत्येकी शंभर रुपये दंड करण्यात येत आहे. या कारवाईत आतापर्यंत महापालिकेच्या विविध भागांतील पथकांनी केवळ सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 110 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी शंभर रुपयांप्रमाणे 11 हजार रुपये दंड वसूल केला. तोंडाला मास्क अथवा रुमाल न लावणाऱ्या 113 जणांवर कारवाई झाली असून त्यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयांप्रमाणे 22 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 

दुकानदारांना 22 हजार दंड 
जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी मुभा दिली असली तरी दुकानदारांनी आपापल्या दुकानांवर ग्राहकांमध्ये "फिजिकल डिस्टन्सिंग' पाळणे बंधनकारक आहे. मात्र, हा नियम मोडून दुकानांवर गर्दी केल्याचे आढळून आल्याने अशा दुकानदारांकडूनही आतापर्यंत दोन हजार रुपयांप्रमाणे 22 हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पथकांनी आतापर्यंत एकूण 55 हजार 600 रुपये दंडाची वसुली केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT