dhule corporation subhash bhamre dhule corporation subhash bhamre
उत्तर महाराष्ट्र

अक्‍कलपाडा पाणीपुरवठा योजनेसाठी डिसेंबरपर्यंत अल्‍टिमेटम

अक्‍कलपाडा पाणीपुरवठा योजनेसाठी डिसेंबरपर्यंत अल्‍टिमेटम

सकाळ डिजिटल टीम

धुळे : महापालिकेच्या सत्तेत असलेल्या भाजपसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या आणि ज्या योजनेमुळे धुळेकरांना रोज पाणी मिळू शकते अशा अक्कलपाडा पाणीपुरवठा (Akkalpada water scheme) योजनेच्या कामावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला खासदार डॉ. सुभाष भामरे (MP Subhsash bhamre) यांनी डिसेंबरअखेरपर्यंत योजनेचे काम पूर्ण झालेच पाहिजे, असा अल्टिमेटम दिला आहे. माजी सभापती सुनील बैसाणे यांनी भूमिगत गटारींचे ऑडिट करून समिती गठित करण्याची मागणी केली. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी जीवन प्राधिकरणावर महापालिकेचे (Dhule corporation) नियंत्रण नसल्याने ते बेभानपणे वागत आहेत. त्यांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे, अशी मागणी केली. (mp subhash bhamre altimetam akkalpada water supply project complate)

धुळे शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भूमिगत गटार आणि अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेला गती देण्यासाठी, कामाची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी खासदार डॉ. भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेच्या (स्व.) अटलबिहारी वाजपेयी सभागृहात आढावा बैठक झाली. बैठकीला महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समितीचे सभापती संजय जाधव, महिला व बालकल्याण सभापती वंदना थोरात, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा नाईक, माजी सभापती सुनील बैसाणे, नगरसेवक हर्षकुमार रेलन, संजय पाटील, नरेंद्र चौधरी, हिरामण गवळी, दगडू बागूल, भगवान देवरे, राजेश पवार, राकेश कुलेवार, किरण अहिरराव आदी उपस्थित होते.

वेळेवर काम न केल्‍याने आम्‍हाला शिक्षा

खासदार डॉ. भामरे म्हणाले, की अक्कलपाडा योजनेच्या जॅकवेलचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले पाहिजे. जॅकवेलचे काम पूर्ण झाले नाही तर योजना कार्यान्वित करता येणार नाही, योजनेच्या पूर्ततेसाठी १८ महिन्यांचा कालावधी दिला होता. कोविडमुळे सहा महिन्यांचा कालावधी आणखी वाढवून दिला आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत ही योजना पूर्ण करा. शहरात आठ-दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे जनतेत रोष आहे. वेळेवर काम न केल्याने त्याची शिक्षा आम्हाला भोगावी लागत आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत काम पूर्ण झालेच पाहिजे. ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे.

भूमिगत गटारींच्या कामाचे ऑडिट

भूमिगत गटारीच्या कामावरूनही खासदार डॉ. भामरेंनी मजिप्रला धारेवर धरले. काम किती झाले ते दाखवा कागदी घोडे नाचवू नका, तुमच्या रस्त्याची कामे केवळ कागदावरच दिसतात. जे रस्ते खोदले आहेत ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करा, असे त्यांनी सुनावले. भूमिगत गटारींच्या कामाबाबत ऑडिट करून समिती गठित करावी, काम झाले नसेल असे समितीला आढळले तर संबंधिताना काळ्या यादीत टाका, अशी मागणी माजी सभापती सुनील बैसाणे यांनी केली. अनुप अग्रवाल यांनीही मजिप्राच्या कारभारावर ताशेरे ओढले. जीवन प्राधिकरणावर राज्य सरकारचे नियंत्रण आहे. मनपाचे नियंत्रण नसल्याने त्यांची मनमानी सुरू आहे. यांच्याशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्‍यांना धारेवर धरा, अशी मागणी त्यांनी डॉ. भामरेंकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT