Artificial Rain
Artificial Rain 
उत्तर महाराष्ट्र

धुळ्यात दुष्काळाची धग; कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी

सकाळ डिजिटल टीम

जिल्हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. प्रत्येक २० किलोमीटरवर पावसाचा असमतोल आढळतो.

धुळे ः पुरेशा पावसाअभावी यंदा कोरड्या दुष्काळाचे (Drought) गडद संकट असून, राज्य सरकारसह (State Government) नाशिक विभागीय महसूल आयुक्तांनी (Nashik Divisional Revenue Commissioner) जिल्ह्यात तत्काळ पूरक उपाययोजनांचा कार्यक्रम हाती घ्यावा. तसेच जिल्ह्यात कृत्रिम पाऊस (Artificial rain) पाडण्याचे नियोजन करावे, असे आर्जव माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, माजी आमदार प्रा. शरद पाटील आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आहे.

श्री. पाटील म्हणाले, की पावसाळ्याचे महत्त्वाचे ६० दिवस संपूनही जिल्ह्यात पुरेसा पाऊस नाही. यात शंभर टक्के पेरण्या झाल्या आहेत. पिके ऊन धरत आहेत. अशात अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अर्ध्या धुळे शहरास पाणीपुरवठा करणारे नकाणे, हरण्यामाळ व अक्कलपाडा प्रकल्पात अद्याप पुरेसा साठा झालेला नाही. या संभाव्य दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महसूल आयुक्तांनी तत्काळ दुष्काळी उपाययोजना आखावी.


पालकमंत्र्यांनी उपाय योजावेत
जिल्हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. प्रत्येक २० किलोमीटरवर पावसाचा असमतोल आढळतो. यंदा आर्वी-शिरूड परिसरात पेरणीपुरता चांगला पाऊस झाला. आता पावसाने दडी मारली आहे. पावसाचे मोजकेच ३० दिवस शिल्लक आहेत. ऑगस्टमध्ये पाऊस पडणार नाही, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. स्वातंत्र्यदिनी दौऱ्यावर येणारे पालकमंत्री आणि विजेसह निरनिराळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुष्काळी स्थितीवर प्रभावी उपाययोजनांचा निर्णय घ्यावा. कोरोना महामारीमुळे आधीच आर्थिक टंचाई व संकटांशी सामना करावा लागत आहे. त्यात दुष्काळी स्थितीची भर पडत आहे. चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर येत आहे. नैसर्गिकदृष्ट्या पर्जन्यछायेच्या या संकटावर मात करण्यासाठी वन, कृषी, महसूल व हवामान खात्याने संशोधन करणे गरजेचे आहे, असे माजी आमदार पाटील यांनी सांगितले.


अनिल गोटे यांची खंत
येत्या आठवडाभरात कृत्रिम पाऊस पाडण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घ्यावा. दुष्काळी स्थितीवर मात करण्याकरता निश्चित कार्यक्रमाची आखणी करून घोषणा करावी, अशी मागणी माजी आमदार गोटे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे केली आहे. अशी अवस्था पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर अथवा पुणे जिल्ह्यात निर्माण झाली असती, तर तेथील सर्वच पक्षांच्या आमदार, खासदारांनी सरकारला हैराण केले असते. मात्र, खानदेशातील सर्वच पक्षांचे नेते राजकीय साठमारीत गुंतले आहेत. अशात ज्यांच्याकडे थोडीबहुत पाण्याची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी कशीतरी आपली पिके जगविली आहेत. शासनस्तरावरून शेतकऱ्यांना धीर देण्याचे प्रयत्न होत नाहीत, ही चिंताजनक स्थिती आहे. या अस्मानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजनांचा स्वतंत्र कार्यक्रम आखून प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी श्री. गोटे यांनी केली.


रावल यांची सरकारकडे मागणी
दमदार पावसाअभावी शेतकरी हवालदिल असून, अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. १० ते १५ दिवसांनी पाणी येत आहे. त्यामुळे गांभीर्य ओळखून सरकारने तातडीने कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज आहे. या स्थितीत शासनाने अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. ही गंभीर बाब आहे, असे आमदार रावल यांनी नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT