Cow Death Cow Death
उत्तर महाराष्ट्र

धुळे जिल्ह्यात पशुवैद्यकांचे आंदोलनामुळे शेतकरी संकटात

Dhule Farmer News : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पशुधन पर्यवेक्षकांचे पदे रिक्त आहेत. त्या ठिकाणी खाजगी पशुवैद्यकीय पर्यवेक्षक काम करतात.

तुषार देवरे

धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी उपचाराअभावी जनावरे मृत होत आहे. बहुतांश जनावरांना विविध आजारांची लागण, आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे.

देऊर (ता. जि.धुळे) : जिल्ह्यात पदविकाधारक पशुवैद्यकीयांच्या व्यावसायिकांचा असहकार, बेमुदत आंदोलनामुळे (Movement of Veterinary Supervisors) आजारी जनावरांना पशुचिकित्सा सेवा मिळणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकरी (Farmer) वर्ग हतबल झाला आहे. दोन दिवसापूर्वी देऊरचे शेतकरी प्रभाकर आनंदा नेरकर यांची एक लाख रूपये किंमतीच्या गायीवर वेळेत उपचार न झाल्याने मृत झाली.

अनेक ठिकाणी उपचाराअभावी जनावरे मृत होत आहे. जिल्ह्यात बहुतांश जनावरांना विविध आजारांची लागण, आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. पशुवैद्यकीय पर्यवेक्षकांचे बेमुदत आंदोलन तात्काळ थांबवा. अशी मागणी संकटग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे. गावोगावी शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. आमचे जनावरे वाचवा हो..! अशी आर्त हाक दुग्ध उत्पादक व्यावसायिक, शेतकरी प्रशासन, शासनास देत आहे. या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी मार्ग काढूनमेटाकुटीस आलेल्या शेतक-यांना मदतीचा हात द्यावा. जनावरांवर वेळेत उपचार होत नसल्याने परिणामी दूध व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. दूध देणारी जनावरे, कृत्रिम गर्भधारणा करणे. आदि प्रश्न ऐरणीवर आले आहे.

शेतकऱ्यांच्या जोडधंद्यावर संकट

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पशुधन पर्यवेक्षकांचे पदे रिक्त आहेत. त्या ठिकाणी खाजगी पशुवैद्यकीय पर्यवेक्षक काम करतात. मात्र काम बंद आंदोलनुळे शेतकऱ्यांचा जोडधंदयावर संकट उभे टाकले आहे. जुलै, ऑगस्ट महिना हा जनावरांच्या दूधवाढीचा कालावधी आहे. मात्र तुलनेत त्यांना वैद्यकीय सेवा मिळत नाही. पावसाळ्यात लाळ, खुरगट, फर्या, घटसर्प, या आजारांचा संसर्ग वाढण्याची भिती असते. शेळ्या मेंढ्यांना लसीकरण केले जाते. ही सर्व सेवा थांबली आहे. पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकर्यांचा जोड धंदा दूध उत्पादनावर विरजण पडले आहे. गरीब शेतकर्‍याची नुकसान भरपाई कोणी द्यावी यासाठी जबाबदार कोण?शासन की डॉक्टर ? शासनाने या संपाबाबत लवकरात योग्य आसा मार्ग काढून शेतकर्‍यांच्या होणारे नुकसान टाळावे.

" गायीला आकस्मिक विषबाधा झाली. वेळेत उपचार होणे आवश्यक होते. देऊरला 15वर्षापासून पशुवैद्यकीय पर्यवेक्षक नाही. खाजगी पशुधन पर्यवेक्षक संपावर आहेत. शासकीय, खाजगी वैद्यकीय सेवा न मिळाल्याने दिवसाला 25 लिटर दूध देणारी एक लाख रूपये किंमतीची गाय मृत झाली. कर्जरूपाने घेतलेल्या गायीचे पैसे परत कसे करावे. हा प्रश्न आहे." :

- प्रभाकर नेरकर, दुग्ध उत्पादक शेतकरी, देऊर (ता.धुळे)

जिल्ह्यात पशुधन संख्या अशी

देशी संकरीत गाय बैलांची संख्या: तीन लाख, 56हजार 203

म्हशी,रेडे: एक लाख 188

शेळ्या: दोन लाख 75हजार 690

मेंढ्या: दोन लाख सहा हजार 789

घोडे शिंगरे: 4 हजार 662

गाढव : 270

डुकरे उंट: 30493

एकूण: नऊ लाख 74हजार 295 पशुधन आहे. तीन लाख पाच हजार 546 कोंबड्या. 15 लाखांपेक्षा अधिक कुकुटपक्षी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT