Farmer suicide 
उत्तर महाराष्ट्र

पावसाची दांडी अन्‌ तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पावसाची दांडी अन्‌ तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ डिजिटल टीम

चिमठाणे (धुळे) : गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेतात कापूस पिकाची केलेली लागवड वाया गेल्याने व बॅंक ऑफ इंडियाचे कर्ज फेडू (Farmers loan) न शकल्याच्‍या विवंचनेत येथील तरुण शेतकरी (Farmer suicide) नरेंद्रसिंह चित्रभानुसिंह गिरासे (वय ४१) यांनी सोमवारी (ता. २१) सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. (dhule-district-young-farmer-suicide-loan-issue-and-no-rain)

नरेंद्रसिंह गिरासे यांनी दहा दिवसांपूर्वी कपाशीची लागवड केली. लागवडीनंतर पाऊस न झाल्याने व दर वर्षी शेतीत पैसे खर्च करूनही हाताला यश नसल्याने राहत्या घराच्या छताला असलेल्या लाकडी कड्याला सुती दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपविले. त्यांची पत्नी वाडी (ता. शिंदखेडा) येथे माहेरी गेल्या होत्या. नरेंद्रसिंह गिरासे यांनी बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून शेतीसाठी कर्ज घेतले होते. वारंवार नापीक व दुष्काळी परिस्थितीमुळे कर्ज फेडू न शकल्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेऊन जीवन संपविले.

मुलगा– मुलगी अनाथ

नरेंद्रसिंग गिरासे त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, पत्नी आहे. येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष रणजितसिंह गिरासे यांचे ते लहान बंधू होत. त्यांच्यावर मंगळवारी (ता. २२) सकाळी अकराला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबत नरेंद्रसिंह गिरासे यांचे चुलत भाऊ कपिल गिरासे यांनी दिलेल्या माहितीवरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT