धुळे : ‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत राज्यातील पहिल्या दहा महापालिकांमध्ये धुळ्याचा (Dhule corporation) समावेश झाला आहे. तसे पत्रही महापालिकेला प्राप्त झाले असून, आता आणखी सक्रियपणे श्रेष्ठ काम करून सर्वांच्या सहकार्याने अव्वल मानांकन मिळविण्याचा मानस आयुक्त अजीज शेख यांनी बैठकीत व्यक्त केला. महापालिकेच्या सभागृहात झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. (dhule-in-ten-municipalities-majhi vasundhara-abhiyan)
या वेळी महापौर चंद्रकांत सोनार, महिला व बालकल्याण सभापती वंदना थोरात, स्थायी समिती सभापती संजय जाधव, सभागृहनेते राजेश पवार, विरोधी पक्षनेते साबीर शेख, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त शिल्पा नाईक आदी उपस्थित होते.
आयुक्त शेख म्हणाले, की राज्यात गेल्या (commissioner ajij shekh dhule corporation) वर्षीपासून ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविले जात आहे. राज्य शासनाचे अतिशय महत्त्वाकांक्षी अभियान आहे. त्यात धुळे महापालिकाही साधारण वर्षभरापासून कार्यरत आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्त्वावर आधारित उपाययोजना करून शाश्वत, निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी अभियान सुरू केले आहे. यात गेल्या वर्षभरापासून महापालिका सक्रियपणे काम करीत आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत (My Earth's Expedition) धुळे महापालिकेने यशस्वी कार्यवाही केलेली आहे. सर्व पदाधिकारी नगरसेवक तसेच विभागप्रमुख, नागरिक व विविध प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमातून अभियान सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल शासनस्तरावर घेण्यात आली आहे. त्याचे फलित म्हणून वर्षभराच्या कामगिरीत महापालिकेने राज्यातील पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले. आगामी काळात या अभियानात निश्चितच अव्बल मानांकन मिळवू, असा आशावादही आयुक्त शेख यांनी व्यक्त केला.
ऑनलाइन पाहणी
रविवारी (ता. ३०) वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ऑनलाइन पद्धतीने माझी वसुंधरा अभियानात महापालिकेने केलेल्या कामांच्या सादरीकरणाची पाहणी करण्यात येईल. सहाय्यक आयुक्त विनायक कोते यांनी प्रास्ताविक केले. माझी वसुंधरा अभियानाचे समन्वयक श्रीनाथ देशपांडे यांनी सादरीकरण केले. तसेच नगरसचिव मनोज वाघ, अनिल साळुंके, चंद्रकांत जाधव, राजेंद्र माईनकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. बैठकीस सर्व विभागप्रमुख, कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापालिकेचे वर्षभरातील कार्य
महापालिकेने वर्षभरात महिन्याच्या दर मंगळवारी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयात येताना सायकलचा वापर करणे, वर्षपूर्ती झालेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करणे, शाळांमध्ये हरित शपथ घेणे, अमृत योजनेंतर्गत जी उद्याने विकसित केलेली आहेत त्यांचे संरक्षण व जतन करणे तसेच सामाजिक संस्थांच्या सहभागातून येऊन व्यापक जनजागृती करण्यात केली. त्याखेरीज कचरा वर्गीकरण, जुन्या साठलेल्या कचऱ्यापासून शास्त्रोक्त प्रक्रिया आदी माध्यमातून माझी वसुंधरा अभियान राबविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.