उत्तर महाराष्ट्र

बंगल्यातील सीसीटीव्हीची आधी दिशा बदलली; नंतर चोरांनी डाव साधला !

निखील सुर्यवंशी

धुळे  ः चोरीचा छडा लागू नये म्हणून बंगल्यातील सीसीटीव्हीची दिशा बदलत चोरट्यांनी कुंडाणे (वार, ता. धुळे) येथे दीड लाखाची रोकड आणि चांदी लंपास केली. शेतकऱ्याला बुधवारी (ता. २३) मध्यरात्रीनंतर चोरट्यांचा धाडसी प्रताप लक्षात आला. 

धुळे शहरापासून जवळच कुंडाणे येथे शेतकरी योगेश पाटील यांचा बंगला आहे. ते जेवणानंतर आई- वडील, पत्नीसह आपापल्या खोलीत गेले. ही संधी साधत चोरट्यांनी पाटील यांच्या बंगल्यात हातसफाई केली. त्यांनी बंगल्या मागे असलेली संरक्षक जाळी कापून प्रवेश केला. मागच्या दरवाजाची कडी उघडत आतील लाकडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. नंतर चोरट्यांनी कपाटातील दीड लाख रुपयांची रोकड, ८० भार वजनाच्या चांदीच्या वस्तू, तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेत पोबारा केला. 

बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आपले चेहरे कैद होणार नाही याची दक्षता चोरट्यांनी घेतली. त्यासाठी त्यांनी कॅमेऱ्याची दिशा बदलली. हातसफाईनंतर चोरटे मोराणे मार्गाकडील नाल्याच्या दिशेने पळाल्याचा अंदाज आहे. चोरीची घटना बुधवारी रात्री ११ ते १२ नंतर घडली असावी. मध्यरात्री शेतकरी पाटील यांचे वडील गोविंदराव यांना जाग आली. त्यांना मागील दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे त्यांनी घरातील सदस्यांना उठविले. त्यांनी पाहणी केली असता रोकड आणि दागिने लंपास झाल्याचे दिसले. माहिती मिळाल्यावर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, साहाय्यक निरीक्षक काळे, राजपूत, काझी, हवालदार मंगळे, ब्राम्हणे, मिस्तरी, पिंजारी, ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरटे माहितगार असावे, असा अंदाज व्यक्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

Parbhani News: फ्लॅट संस्कृती वाढली; पण घर घेणे झाले महाग!; रेडीरेकनर दरवाढीचा फटका;नागरिकांचे बजेट कोलमडले

IPL Viral Video: ए चल निघ आता... इशान किशनला आऊट करत SRH च्याच गोलंदाजाचा रागात इशारा, मग पुढे...

Raam Navami 2026: रामनवमीपूर्वी 'या' 5 गोष्टी घरात आणा, सुख-समृद्धी निश्चित अन् माता लक्ष्मीचे आगमनही होईल

ना कुत्रा ना मांजर; पूजा सावंतला घरात पाळायचा आहे हा भयंकर प्राणी ! अभिनेत्रीचा खुलासा

SCROLL FOR NEXT