tolnaka tolnaka
उत्तर महाराष्ट्र

लळिंग, सोनगीर टोलवर ‘बचती’चा मंत्री नितीन गडकरींचा दावा फोल

टोलनाक्यावर बहुतांश वेळा वाहनांच्या रांगा असल्याचे चित्र आहे.

निखील सुर्यवंशी



धुळे ः मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) लळिंग (laling), सोनगीर (songir) टोलनाक्यावर फास्टॅगची व्यवस्था (Fastag on Tolnaka) आहे. तरीही टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. वेळखाऊ कोंडीमुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. टोल प्रशासनाच्या व्यवस्थापनाअभावी वाहनांच्या रांगा लागत असल्याचा आरोपही चालकांनी केला आहे. (laling songir tolnaka fastag vehicles traffic jam)

फास्टॅग बसविल्याने वेळेची बचत होईल, असा दावा केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी केला. मात्र, लळिंग, सोनगीर टोलनाक्यावर मंत्री गडकरी यांचा दावा फोल ठरत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणची फास्टॅग यंत्रणा सुरळीत करण्यात यावी आणि वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली. केंद्रीय परिवहन विभागातर्फे गेल्या दोन वर्षांपासून फास्टॅग प्रणालीची व्यवस्था करण्यात आली. फास्टॅग प्रणालीमुळे टोलनाक्यांवरील वाहनांच्या रांगा कमी होऊन वाहनधारकांच्या इंधन बचतीसह वेळेची बचत होईल, असा विश्वास परिवहन विभागास आहे.


या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच टोलनाक्यांवर फास्टॅग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. मात्र, धुळे शहराजवळील लळिंग, सोनगीर येथील टोलनाक्यावर बहुतांश वेळा वाहनांच्या रांगा असल्याचे चित्र आहे. वाहने रांगेत लागल्यानंतर बऱ्याच वेळा फास्टॅग स्कॅन होत नसल्याने वाहन मागे-पुढे करावे लागते. यात बराच काळ लागतो. परिणामी, मागे असलेली वाहने खोळंबतात. एकच वाहन बराच काळ घेत असल्याने चालक वैतागतात. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे इंधनाची नासाडी होते आणि वेळेचाही अपव्यय होतो. लळिंग टोल व्यवस्थापनाने फास्टॅग सुविधेत सुधारणा करावी. वाहन जास्त काळ रांगेत उभे राहणार नाही, याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली.

रुग्णवाहिकेचे काय?
वाहनांच्या रांगेत रुग्णवाहिका अडकल्यास रुग्णासह त्यांचे नातेवाईक वैतागतात. रुग्णवाहिकांसह अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी स्वतंत्र लेनची व्यवस्था करावी, अशी मागणीही आहे. लळिंग-अवधान टोल व्यवस्थापनाने योग्य ते बदल करून वाहनचालक आणि प्रवाशांना दिलासा द्यावा, अशीही मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT