उत्तर महाराष्ट्र

धुळ्यातील ‘डेंगी’प्रश्‍नी महापालिकेचे आयुक्त मैदानात

आयुक्त टेकाळे यांनी फवारणी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, औषधसाठ्याची माहिती घेत प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.

निखील सुर्यवंशी



धुळे ः शहरात डेंगीसह (Dengue) विविध साथरोगांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजनांच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी नवनियुक्त आयुक्त देवीदास टेकळे (Commissioner Devidas Tekle) गुरुवारी (ता. २३) मैदानात उतरले. त्यांनी शहरातील काही भागांत भेटी दिल्या. नागरिकांशी संवाद साधला. महापौरांच्या (Mayor) आदेशानुसारच त्यांनीही येत्या १५ दिवसांत शहरात डेंगीच्या डासांचे निर्मूलन व्हायला हवे, रुग्ण आढळून यायला नको यादृष्टीने उपाययोजना करा, अशा सूचना यंत्रणेला दिल्या.


शहरात डेंगी, चिकूनगुनियासह व्हायरल इन्फेक्शनचे रुग्ण वाढले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी डेंगीने एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर महापालिकेच्या कारभाविरोधात नागरिकांमध्ये मोठा रोष आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर नवनिर्वाचित महापौर प्रदीप कर्पे यांनी डेंगीवरील उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेत १५ दिवसांनंतर शहरात डेंगीचा रुग्ण आढळून यायला नको, अशी तंबी दिली. दरम्यान, या उपाययोजनांची आयुक्त टेकाळे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. उपायुक्त गणेश गिरी, सहाय्यक आयुक्त पल्लवी शिरसाट, सहाय्यक आरोग्याधिकारी लक्ष्मण पाटील, सहाय्यक आरोग्याधिकारी चंद्रकांत जाधव, स्वच्छता निरीक्षक गजानन चौधरी, एसएफडब्ल्यू नंदलाल खांडेकर, कंत्राटदार शेवाळे आदी उपस्थित होते. नवरंग पाण्याची टाकी, दोंदे कॉलनी, फुले कॉलनी, पारोळा रोड आदी भागात त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. नागरिकांशीही संवाद साधला.


रुग्ण आढळायला नको
आयुक्त टेकाळे यांनी फवारणी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती, औषधसाठ्याची माहिती घेत प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. सर्व उपाययोजनांतून येत्या १५ दिवसांत शहरात डेंगी डासांवर नियंत्रण, निर्मूलन झाले पाहिजे. दवाखान्यांमध्ये डेंगीचे रुग्ण आढळून यायला नको अशा पद्धतीने प्रभावीपणे उपाययोजना करा, अशा सूचना श्री. टेकाळे यांनी अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटदाराला दिल्या. ज्या-ज्या ठिकाणी हंगामी व कायमस्वरूपी पाण्याची डबकी साचतात अशा डबक्यांचेही सर्वेक्षण करून या डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही, तेथे त्यांचे वास्तव्य राहणार नाही यासाठी उपाययोजना करा. अशा पाण्याच्या डबक्यांमध्ये ‘एमएलओ’ (मॉस्क्युटो लार्व्हीसायडल ऑइल) टाकून डासांवर नियंत्रणाचा प्रयत्न आहे. ही कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आली आहे.


डॉक्टर, लॅबही केले ‘कनेक्ट’
डेंगी, मलेरिया, चिकूनगुनिया, झिका आदींचे रुग्ण आढळल्यानंतर त्याची माहिती महापालिकेच्या यंत्रणेला द्यावी यासाठी यापूर्वीही प्रशासनाने शहरातील खासगी दवाखान्यांना सूचना दिल्या होत्या. दरम्यान, आता महापालिकेने यासाठी एक लिंक तयार केली असून, ती शहरातील ५३ खासगी दवाखाने व ७० लॅबला शेअर केली आहे. या लिंकच्या माध्यमातून संबंधित दवाखाने, लॅब अशा रुग्णांची माहिती दररोज स्प्रेडशीटमध्ये भरत जातील, त्यामुळे अशा रुग्णांची माहिती दररोज अपडेट राहण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

PSL 2026: अपमानाचे घोट गिळत, बाबर आझम पेटला, १२ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; मेंडिसचे शतक अन् समदच्या ३३३ च्या स्ट्राईक रेटने धावा...

Pune Mulshi Bhalgudi fire News: भालगुडीतील लव्हाळवाडीत आठ घरांना भीषण आग; आठ कुटुंबे उघड्यावर, पावसाळ्यापूर्वी घरकुल व तातडीच्या मदतीची मागणी

SCROLL FOR NEXT