उत्तर महाराष्ट्र

Video : ऊसाच्या शेतात बिबट्याचे चार बछडे 

सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर : देगाव (ता. साक्री) शिवारातील उसाच्या शेतात बिबट्याचे चार बछडे आढळले. या परिसरात बिबट्याच्या मादीचा वावर आहे. ती बछड्यांजवळ दोन दिवसात परतण्याची शक्‍यता लक्षात घेत संरक्षण आणि दक्षतेसाठी वन विभागाने निगराणी ठेवली आहे. 

देगाव येथील शेतकरी भटू जिभाऊ अकलाडे यांच्या शेतात तीन दिवसांपासून ऊसतोडीचे काम सुरू आहे. मजुरांना ऊस तोडणी करताना शेतातील मध्यभागी चार बिबट्याची 2 ते 3 दिवसांचे बछडे आढळले. बछडे अचानक नजरेस पडल्याने मादी बिबट्या जवळपास असण्याच्या शक्‍यतेमुळे सर्वांनी शेताबाहेर पड काढला. मजुरांसह परिसरातील सर्वच शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. बछड्यांना काही धोका पोहचू नये, म्हणून ग्रामस्थ व मजुरांनी त्वरित ऊसतोड बंद केली. घटनेची माहिती मजुरांनी शेतकरी भटू अकलाडे यांना दिली. अकलाडे यांनी पिंपळनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण माळके यांना माहिती दिली. त्यांनी आपल्या बिट कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. कोणत्याही क्षणी बिबट मादी बछड्यांजवळ (शेतात) येऊ शकते, हल्ला करू शकते. 

बछडे निगराणीत 
बिबट मादी रोज आपल्या बछड्यांची जागा बदलते. 5 ते 7 दिवसानंतर बछडे मोठे झाल्यावर या जागेवरून निघून जातील. तोपर्यंत काळजी घेणे आवश्‍यक आहे. वनकर्मचाऱ्यांना देखरेखीसाठी नियुक्त केल्याची माहिती श्री. माळके यांनी 'सकाळ'ला दिली. शेतकरी भटू अकलाडे, सुधीर अकलाडे, प्रशांत अकलाडे, भिकन दहीते आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Pune News: पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रस्त्यावर १५ दिवसांपासून मुतारीचे पाणी रस्त्यावर, प्रशासनाचा निष्काळजीपणा

Latest Marathi News Live Update : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात भीषण अपघात,ट्रॉला 35 फूट खोल दरीत कोसळला

'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च; WhatsApp वर मिळणार आयुष्मान भारत योजनेची सुविधा

RTI Maharashtra: माहिती अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती; मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्यांची घेतली दखल, राळेगणसिद्धीत जल्लोष

SCROLL FOR NEXT