Arrest 
उत्तर महाराष्ट्र

धुळ्यात तब्बल..साडेसात लाखांची ब्राउन शूगर जप्त

सकाळ वृत्तसेवा



धुळे : राज्यात अमली पदार्थ तस्करीचे प्रकरण गाजत असतानाच धुळे शहरात पोलिसांनी (Dhule Police) एका तरुणाकडून तब्बल अर्धा किलो ब्राउन शूगरचा साठा जप्त (Brown Sugar Seized) केला. या प्रकरणी भुसावळ (जि. जळगाव) येथील संशयित तरुणाला अटक करण्यात आली आहे. या ब्राउन शूगर साठ्याचा धुळ्याशी काय संबंध, याचा पोलिस शोध घेत आहेत.


धुळ्यात अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे दोन दिवसांपासून पथकातील पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व मोहाडी पोलिस ठाण्याचे पथक तस्कराच्या मागावर होते. दरम्यान, शनिवारी रात्री नऊच्या सुमारास मुंबई- आग्रा महामार्गावर हॉटेल रेसिडेन्सिजवळ उभ्या असलेल्या तरुणाजवळ अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली.


या कारवाईत त्याच्याकडे ब्राउन शूगर मिळून आले. तब्बल अर्धा किलोच्या या ब्राउन शुगरची किंमत साडेसात लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. अटक केलेल्या तरुणाने आपले नाव सय्यद शेरू सय्यद बुडन (रा. भुसावळ) असे सांगितले. ब्राउन शूगरचा हा साठा भुसावळ येथून धुळ्यात विक्रीसाठी आणल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. त्यामुळे धुळ्यात हा साठा घेणारे कोण, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस कसून चौकशी करत आहेत. विशेष पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. शेखर यांच्या विशेष पथकातील पोलिस निरीक्षक बी. जी. रोहम, हेमंत पाटील, मोहाडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक एम. आय. मिर्झा यांच्यासह फिरोज पठाण, नितीन सपकाळे, राजेंद्र मराठे, संदीप थोरात, प्रभाकर ब्राह्मणे, प्रवीण पाटील, राहुल गुंजाळ, जितेंद्र वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT